दख्खनचा राजा जोतिबाच्या अश्वाचं अकस्मात निधन, मंदिर परिसरात हळहळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दख्खनचा राजा जोतिबा या देवाच्या सेवेला असणाऱ्या अश्वाचं अकस्मात निधन झालं आहे. हा पांढऱ्या शुभ्र रंगाचा घोडा मागच्या दहा वर्षांपासून जोतिबाच्या मंदिरात सेवेत होता. त्याचं अचानक निधन झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे. जोतिबाचं वाहन म्हणून या घोड्याची ओळख होती.

मंदिर परिसरातच या घोड्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्याच्या देखरेखीसाठी सेवक देखील नेमण्यात होता. प्रत्येक पालखी सोहळ्याला या घोड्याची हजेरी क्रमप्राप्त असायची. काही भाविक जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर घोड्याचा देखील दर्शन घ्यायला तबेल्यात जात होते. या घोड्याकडं देखील अध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं जायचं. असा हा दख्खनचा राजा जोतिबाचा सेवक घोडा आज अनंतात विलीन झाला. या घोड्याला जोतिबाच्या भाविकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जोतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन नाग आहे. जोतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव आणि तेवणाऱ्या ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची बहिण यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला आहे.

अगस्ती मुनी जेव्हा दक्षिणेकडे आले तेंव्हा काही काळ रत्नागिरी डोंगरावर वास्तव्यास राहून तपश्र्चर्या केली आहे त्यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंग स्थापन केली आहेत त्यापैकी केदारनाथाचे मुख्य मंदिर होय. जोतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली आहे.ज्योतिर्लिंग या शब्दाचा अपभ्रंश गावठी भाषेत जोतिबा झाले आहे. हे केदारनाथाचे रूप. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच जोतिबा होय. जोतिबा देव दख्खनचा राजा, केदारलिंग, सौदागर, रवळनाथ या नावांनीही ओळखला जातो. जोतिबा देवाची मूर्ती स्वयंभू असून साधारणपणे ती साडेचार फूट उंचीची आहे. मूर्ती बटू भैरवनाथाच्या अवतारातील असून चतुर्भुज आहे. मूर्तीच्या हाती खड्‌ग, त्रिशूल, डमरू असून त्यांचे वाहन घोडा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT