महाराष्ट्रात जीवाला धोका, लखनऊ मध्ये शरण येणार-किरण गोसावी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्यन खान प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आणि ज्यांच्यावर आरोप झाला ते किरण गोसावी हे आता लखनऊमध्ये शरण येणार आहेत. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्रात आपल्याला जीवाचा धोका वाटतो आहे असं किरण गोसावी यांनी सांगितलं आहे. कॉर्डिलिया क्रूझ शिप आणि ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये के. पी. गोसावी हे पंच होते. तसंच मनिष भानुशालीही पंच होते.

आर्यन खानला आत्तापर्यंत चारवेळा जामीन नाकारण्यात आला आहे. 2 तारखेपासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. अशात रविवारी याच प्रकरणातला एक साक्षीदार आणि किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने मीडियासमोर येऊन गोसावी आणि समीर वानखेडेंवर काही आरोप केले ज्यामध्ये आर्यन खानला सोडून देण्यासाठी शाहरुखकडे 25 कोटी रूपये मागण्यात आले होते. ते के. पी. गोसावी यांनी मागितले आणि त्यातले ८ कोटी रूपये समीर वानखेडेंना दिले जाणार होते हा मुख्य आरोप आहे. अशात के. पी. गोसावी यांनी फोनवरून इंडिया टुडेशी चर्चा करत हे सगळे आरोप फेटाळले आहेत. त्या पाठोपाठ त्यांचं आणखी एक वक्तव्य समोर आलं आहे. आपल्या जिवाला महाराष्ट्रात धोका त्यामुळे आपण लखनऊमध्ये पोलिसांना शरण येणार असल्याचं किरण गोसावी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गोसावीने इंडिया टुडेला सांगितले, ‘मला स्वतःला महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवायचे होते, परंतु या राजकीय मुद्यांमुळे मी स्वतःला लपवत होतो. मला क्रूज पार्टी ड्रग प्रकरणाबद्दल सत्य सांगायचे आहे. पुण्यात अटकेनंतर माझा वाईट छळ होईल असे मला कोणीतरी सांगितले होतं. महाराष्ट्रात माझा जीव धोक्यात आहे, त्यामुळे मी लखनऊमध्ये आत्मसमर्पण करणार आहे. मला सातत्याने धमकीचे फोन येत आहेत.’

रविवारी के. पी. गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा आरोप केला की शाहरुख खानकडे के. पी. गोसावी यांनी 25 कोटींची मागणी केली होती. या आरोपांना के. पी. गोसावी यांनी आता उत्तर दिलं आहे. मी समीर वानखेडेंना ओळखत नाही असं गोसावी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही फरार आहात, आत्ता तुम्ही कुठे आहात?

ADVERTISEMENT

के.पी. गोसावी- मी ६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत होतो. ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मला धमकी देणारे अनेक फोन आले. त्याबाबत मी एनसीबीलाही कल्पना दिली आणि माझ्या वकिलांनाही कल्पना दिली होती. मात्र असे काही कॉल्स आले की मला फोन माझा फोन बंद करावा लागला. ८ ते १० नंबर्स असे होते ज्यांचे माझ्याकडे डिटेल्स आहेत. त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?

तुम्ही समीर वानखेडेंना कधीपासून ओळखता?

के.पी. गोसावी- मी समीर वानखेडेंना ओळखत नाही. मी त्यांना टीव्हीवर पाहिलं आहे. आम्हाला म्हणजे मला आणि मनिष भानुशाली यांना क्रूझ पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. व्ही. व्ही सिंग सरांना आम्ही भेटलो त्यानंतर आमची भेट समीर वानखेडे यांना भेटलो.

Exclusive : मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, त्यांना टीव्हीवर पाहिलं आहे-के.पी. गोसावी

तुम्ही याआधी कधी एनसीबीच्या छाप्यात सहभागी झाला होतात का?

के.पी. गोसावी- नाही मी याआधी कोणत्याही प्रकरणात नव्हतो. एक पंचनामा मी शिपवर साईन केलं होतं आणि बाकी सह्या एनसीबी कार्यालयात केल्या. त्या पेपरवर दहा लोकांची नावं होती. त्यातलं एक नाव आर्यन खानचं होतं.

आर्यन खान सोबत तुमचा फोटो व्हायरल झाला, तुम्ही त्याचं बोलणं कुणाशी करवून दिलं?

के.पी. गोसावी- आर्यन खानने मला विनंती केली होती की माझ्या मॅनेजरला फोन लावून त्यांना इथे काय झालं आहे ते सांगू द्या. म्हणून मी त्याला फोन लावून दिला. मात्र तो फोन कुणीही उचलला नाही. त्यानंतर सॅम नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि त्याने मी तुमचं बोलणं करवून देतो असं आर्यनला सांगितलं होतं. त्याने आर्यन खानचं बोलणं पूजा सोबत करून दिलं होतं. पूजा सोबत मी काहीही बातचीत केली नाही.

तुम्ही एनसीबीच्या कार्यालयात गेल्यानंतर आर्यन खानला कसे भेटलात? त्यांना फोन कसा लावून दिला?

मला नियम माहित नव्हते. तिथे सगळे लोक बसले होते त्यात आर्यन खानही होता. त्याने मला विनंती केली होती की मला फोनवर बोलू देता का? तेवढं मी केलं. बाकी माझं पूजासोबत किंवा इतर कुणाशीही बोलणं झालं नाही.

हे देखील गोसावी यांनी इंडिया टुडेशी चर्चा करताना सांगितलं आहे. आता के. पी. गोसावी जर पोलिसांना शरण आले तर त्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT