BJP नेते मधुकर पिचड आणि कुटुंबाविरोधात सुनेकडून अत्यंत गंभीर आरोप, FIR ही दाखल

Madhukar Pichad: माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BJP नेते मधुकर पिचड आणि कुटुंबाविरोधात सुनेकडून अत्यंत गंभीर आरोप, FIR ही दाखल
daughter in law made extremely serious allegations against bjp leader madhukar pichad and family lodged police complaint(फाइल फोटो, सौजन्य: Facebook)

प्रविण ठाकरे, नाशिक

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर त्यांच्याच सुनेने प्रचंड गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नव्हे तर पिचड कुटुंबीयांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

मधुकर पिचड यांच्या सुनेने आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी केला आहे. एवढंच नव्हे तर मधुकर पिचड यांनी स्वतःच्या मुलाला देखील आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या मुलाने म्हणजेच माझ्या पतीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. तसंच पिचड यांच्या सुनेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत असंही म्हटलं आहे की, पिचड कुटुंबीयांपासून माझ्या जिवाला धोका आहे.

यासंदर्भात पिचड यांच्या स्नुषा राजश्री किरण देशमुख - (पिचड) यांनी आपले वकिल उमेश वालझाडे यांच्यामार्फत नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मधुकर पिचड यांच्या सुनेने नेमके काय आरोप केले आहेत?

पिचड यांच्या स्नुषा राजश्री किरण देशमुख (पिचड) यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर मीडियाशी बोलताना अनेक आरोप केले आहेत.

यावेळी त्या असं म्हणाल्या की, 'मी 2019 मध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता, पण तत्कालीन पोलीस यंत्रणेने साथ दिली नाही. फक्त महिला शाखेने अर्ज लिहून घेतला पण काहीही कारवाई झाली नाही. दरम्यान, तक्रार दिल्यानंतर माझ्यावर हल्ला करण्याची धमकीही देण्यात आली म्हणून मी पोलीस संरक्षण देखील मागितले आहे.'

'सुरुवातीला माझे पतीही मला त्रास द्यायचे. त्यामुळे त्या-त्या वेळी मी त्यांच्याविरोधात देखील पोलिसात तक्रार दाखल केल्या आहेत. आमच्या पती-पत्नी दरम्यान जेव्हा भांडण होत असे. तेव्हा घरातील मंडळी याबाबत माझ्या पतीला प्रोत्साहन देत असत.'

'मला घरात मोलकरणीसारखी वागणूक देत असत. मानसिक व शारीरिक छळ करीत असत. मला अपशब्द वापरून ते मानसिक छळ होत असे. 2015 च्या दरम्यान घरातील मंडळींनी माझ्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केलं. त्यानंतर पतीच्या मालकिची दीड कोटी रुपयांची बालाजी वेव्हरेजेस कंपनीचे बनावट कागदपत्र तयार करून व कंपनीच्या नावात बदल करून माझे सर्व हक्क संपवले. माझ्या पतीचे दागीने, पॅालिसी व ठेवी देखील काढून घेतल्या.' असे अनेक गंभीर आरोप राजश्री पिचड यांनी केले आहेत.

दरम्यान, आता याबाबत मधुकर काशीनाथ देशमुख (पिचड), जगदीश किरण देशमुख (पिचड), कमलबाई मधुकरराव देशमुख, सौ. अश्विनी रणजीत दरेकर, रणजीत चंद्रकांत दरेकर यांच्या विरोधात कलम 498 A, 406, 306, 324, 504, 506, 467, 468, 471 आदी कलमांन्वये 30 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी राजश्री पिचड यांनी असंही स्पष्ट केलं आहे की, 'याविषयी कोणताही राजकीय हेतू नाही. माझ्यावर झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मी आपल्यासमोर आली आहे. दोन वर्षापूर्वीही मी पोलिसात गेले होते पण मला तेव्हा पोलिसांकडून सहकार्य मिळालं नव्हतं. पण आता किमान एफआयआर तरी दाखल झाला आहे.' असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, या तक्रारीनंतर भाजपचे दिग्गज नेते मधुकर पिचड हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

daughter in law made extremely serious allegations against bjp leader madhukar pichad and family lodged police complaint
MNS City President: अनेक स्त्रियांशी संबंध, मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

दुसरीकडे, याप्रकरणी मधुकर पिचड यांच्याशी संपर्क साधला असता मधुकर पिचड यांच्या फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. तर पिचड यांचे सुपुत्र वैभव पिचड यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in