समीर वानखेडेंच्या लग्न पत्रिकेत वडिलांचे नाव दाऊद, नवाब मलिकांच्या मुलीने पोस्ट केली लग्न पत्रिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

समीर वानखेडे विरूद्ध नवाब मलिक या संघर्षात आता त्यांच्या मुलींनीही सहभाग घेतल्याचं दिसतं आहे. कारण आता समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका नवाब मलिक यांच्या मुलीने ट्विट केली आहे. या पत्रिकेत समीर वानखेडेंचं पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असं लिहिण्यात आल्याचं तिने म्हटलं आहे. नीलोफर मलिकने ही पत्रिका ट्विट केली आहे.

काय म्हटलं आहे नीलोफर मलिकने?

समीर वानखेडे यांचा निकाह 7 डिसेंबर 2006 ला लोखंडवाला कॉम्प्लेक्स या ठिकाणी शबाना कुरेशींसोबत झाला. या विवाहाची जी लग्न पत्रिका आहे त्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असं नाव लिहिण्यात आलं आहे असं पत्रिका ट्विट करत नीलोफर मलिक-खानने म्हटलं आहे. समीर वानखेडे हे दाऊद आणि जहिदा वानखेडे यांचे सुपुत्र असा उल्लेख पत्रिकेत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सना मलिकने काय म्हटलं आहे?

सनाने समीर वानखेडे यांचं मॅरेज सर्टिफिकेट ट्विट केलं आहे. त्यामध्ये यास्मीन अझीज खान, निखिल छेडा आणि ग्लेन पटेल हे साक्षीदार असल्याचं दिसत आहे.

ADVERTISEMENT

जी पत्रिका ट्विट करण्यात आली आहे ती पहिल्या पत्नीच्या कुटुंबीयांनी छापली आहे. त्यांनी काय छापलं होतं ते आम्हाला माहित नाही असं वानखेडेंतर्फे सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर छापा मारत आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. ही कारवाई 2 ऑक्टोबरला झाली होती. त्यानंतर 6 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांनी केलेली ही कारवाई म्हणजे बनाव आहे असा दावा केला. त्यानंतर जवळपास रोज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप केले आहेत.

समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन?; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

काय आहेत नवाब मलिक यांनी केलेले आरोप?

आर्यन खानचं अपहरण करून शाहरुख खानकडून मोठी खंडणी उकळण्याचा समीर वानखेडे यांचा डाव होता. त्यामुळेच कॉर्डिलिया क्रूझवर कारवाई करण्याचा बनाव रचला गेला.

आर्यन खानवर केलेली कारवाई भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानुसार होती. यातल्या इतर लोकांना भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून सोडून देण्यात आलं.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत त्यांच्या वडिलांनी मुस्लिम स्त्रीसोबत विवाह करण्यासाठी धर्म परिवर्तन केलं, त्यानंतर ते परत हिंदू धर्मात परतले.

समीर दाऊद वानखेडे असंच नाव समीर यांच्या जन्मदाखल्यावर आहे.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असूनही त्यांनी आपण एससी असल्याचे दाखवत आणि सगळ्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारी नोकरी मिळवली.

खंडणी गोळा करण्यासाठीच समीर वानखेडे हे विविध बॉलिवूड स्टार्स आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या कलाकारांना धमकावत असतात.

समीर वानखेडे 70 हजारांचे टीशर्ट, 1 लाखाचे बूट वापरतात. सरकारी अधिकाऱ्याकडे इतका पैसा कुठून येतो?

हे मुख्य आरोप करण्यात आले आहेत. आता नवाब मलिक यांच्या मुलींनीही समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT