Defamation case : 'त्या' कागदपत्रांबद्दल नवाब मलिकांनी न्यायालयात केला खुलासा

नवाब मलिकांनी विरुद्ध समीर वानखेडेंच्या वडिलांनी अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला आहे... या प्रकरणात न्यायालयाने मलिकांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते...
Defamation case : 'त्या' कागदपत्रांबद्दल नवाब मलिकांनी न्यायालयात केला खुलासा
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे.India Today

ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आलेले एनसीबीचे मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आरोप करत मलिकांनी काही कागदपत्रंही सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती. या आरोपांनंतर समीर वानखेडेंच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अबुनुकसानीचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने यासंदर्भात उत्तर देण्याचे आदेश दिल्यानंतर मलिकांनी न्यायालयात शपथपत्र दाखल केलं.

समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल मलिकांनी गंभीर आरोप केलेले आहेत. समीर वानखेडे मुस्लीम असून, त्यांनी बोगस जात प्रमाणपत्रावर अनुसूचित जाती प्रवर्गातून नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला होता. मलिकांनी समीर वानखेडेंचा जन्म दाखला आणि पहिल्या निकाहचे फोटो आणि निकाहनामाही सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे.
Nawab Malik यांच्यावर वानखेडेंनी टाकलेली डिफेमेशन केस म्हणजे काय? अब्रुनुकसानीचा दावा कधी करता येतो? समजून घ्या

मलिकांकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात आली होती का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाकडून मलिकांकडे करण्यात आली होती.

नवाब मलिक यांनी शपथपत्र दाखल करत आपली भूमिका मांडली आहे. नवाब मलिक यांनी शपथपत्रात म्हटलं आहे की, 'फिर्यादीने ज्याबद्दल अब्रुनुकसानीचा आरोप केलेला आहे, त्याला उत्तर म्हणून आपण हे संक्षिप्त शपथपत्र दाखल करत आहे. ज्या कागदपत्रांवरून फिर्यादी अब्रुनुकसानीचा दावा करत आहे, त्याची वाजवी पडताळणी केलेली असल्याचा खुलासा करण्यासाठी हे शपथपत्र दाखल करत आहे.'

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे.
'नवाब मलिक कोण होते? कुर्ला या ठिकाणी काय करायचे याबाबत योग्यवेळी तोंड उघडणार'

मलिकांनी सादर केलेल्या कागदपत्रांची दोन विभागात विभागणी करता येईल, अस या शपथपत्रात म्हटलेलं आहे. 'एका भागात समीर वानखेडे यांचा जन्मदाखला आणि समीर वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरैशी यांच्यासोबत केलेल्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा, जे संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करण्यात आलेलं आहे. तर दुसऱ्या भागात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्विटचा समावेश आहे.'

'जन्म दाखला आणि निकाहनामा यांची आवश्यक ती पडताळणी करण्यात आलेली आहे. प्रश्न समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याबद्दल आहे, तर त्यांचा जन्मदाखला बृहन्मुंबई महापालिकेच्या ई-वार्डकडून त्यांची नोंदणी केलेली आहे. त्याची मी पडताळणी केलेली असून, संबंधित वर्षात 3744 या नोंदणी क्रमांकाने त्यांचा जन्मदाखल्याची नोंद मिळू शकते. त्याचबरोबर निकाहनामा मला त्यांच्या पहिल्या पत्नीच्या नातेवाईकांनी दिला आहे,' असं मलिकांनी न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे.
‘उडता पंजाब’ नंतर ‘उडता महाराष्ट्र’ करण्याचा कट होता; नवाब मलिक यांचा आरोप

अब्रुनुकसानीच्या याचिकेत मलिक यांनी केलेल्या ट्विटचाही उल्लेख आहे. त्याबद्दलही मलिकांनी उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावरील ज्या पोस्ट बदनामीकारक मानल्या जात आहेत, त्याबद्दल वानखेडेंनी आधीच मान्य केलं आहे की, ती माहिती आणि फोटो हे रिपोस्ट करण्यात आलेले आहेत, जे की त्यांच्याच (वानखेडे) सोशल मीडिया अकाऊंटवरून घेण्यात आलेली होती.

जन्मदाखला आणि निकाहनामा खोटा वा निराधार असल्याचं वाखनेडेंनी म्हटलेलं नाही. त्याचबरोबर ज्या पोस्ट केल्या गेल्या त्या आपण केलेल्या नसून, फक्त रिपोस्ट केलेल्या असल्याचंही मान्य केलेलं आहे, असं सांगत मलिकांनी वानखेडेंनी दाखल केलेली याचिका फेटाळूण्याची मागणी केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in