Delta Plus: चिंताजनक... महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 7 रुग्ण सापडले, 'या' एकाच जिल्ह्यात आढळले पाच रुग्ण

Delta Plus Variant: महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे पाच रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे.
Delta Plus: चिंताजनक... महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 7 रुग्ण सापडले, 'या' एकाच जिल्ह्यात आढळले पाच रुग्ण
Delta Plus(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: देशात आतापर्यंत कोरोनाचे (Corona) सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात (Maharashtra) सापडले आहेत. त्यातही आता आणखी चिंता वाढविणारी एक नवी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा सर्वाधिक घातक समजला जाणाऱ्या डेल्टा प्लस (Delta Plus) व्हेरिएंटचे सात नवे रुग्ण समोर आले आहेत. रत्नागिरी, (Ratnagiri) नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पालघर (Palghar) भागातून घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये या नव्या व्हेरिएंटची पुष्टी करण्यात आली आहे.

या नवीन व्हेरिएंटबाबत आणखी जाणून घेण्यासाठी सरकारने जीनोम सिक्वेंसींगसाठी आणखी काही नमुने पाठवले आहेत.

या प्रकारामुळे महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Delta Plus
समजून घ्या : जगभरात धुमाकूळ घालणारा डेल्टा वेरिएंट नेमका आहे तरी काय?

जीनोम सिक्वेंसींगसाठी नमुने पाठवले- डॉ. लहाने

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (DMER) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी अशी माहिती दिली की 'नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरी येथे आम्हाला नवीन व्हेरिएंट सापडले आहेत. आम्ही जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आणखी काही नमुने पाठवले आहेत.'

राज्यभरात दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधील पॉझिटिव्हिटी रेट सतत वाढत असल्याचं दिसून येत आहे.

एकट्या रत्नागिरीमध्येच सापडले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे पाच रुग्ण

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे जे सात रुग्ण सापडले आहेत त्यापैकी पाच रुग्ण हे रत्नागिरीमधील आहेत.

10 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी प्रमाण 13.7 टक्के होते. तर राज्याची सरासरी काढली गेली तर ती 5.8 टक्के एवढी आहे.

Delta Plus
Corona : भारतात आढळलेला स्ट्रेन ओळखला जाणार Delta या नावाने, WHO ने घेतला निर्णय

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार रत्नागिरीमध्ये सध्या 6553 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश आहे.

रत्नागिरीचे सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्र गावडे म्हणाले की, 'पाच रुग्णांमध्ये नवे व्हेरिएंट सापडल्यानंतर त्या रुग्णांचे गाव सीलबंद करण्यात आले आहे. तसेच कंटेन्ट झोन तयार करण्यात आले आहेत. यापैकी दोन लोकांना साथीच्या रोगाची कोणतीही लक्षणे नाहीत.'

ते पुढे असंही म्हणाले की, 'ज्या गावात डेल्टा प्लसचे व्हेरिएंट सापडले आहेत. तेथील लोक बहुदा हे परदेशात जातात. पण, संक्रमित व्यक्तींमध्ये कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही.'

डेल्टा प्लस व्हेरियंट डेल्टापेक्षा वेगळा कसा आहे?

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस डेल्टा संसर्ग झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला लागण होते. पण डेल्टा प्लसच्या बाबतीत ते अद्याप दिसत नाही.

Delta Plus
Exclusive : Delta व्हेरिएंटमुळेच देशात आणि महाराष्ट्रात Corona ची दुसरी लाट, अभ्यास अहवालात निष्कर्ष

डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता- टास्क फोर्स

महाराष्ट्र सरकारच्या कोव्हिड-19 टास्क फोर्सने डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात कोरोनाची तिसरी लाट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले की तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांची संख्या दुसर्‍या लाटेपेक्षा जास्त असू शकते.

काय आहे कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट?

भारतात मिळालेल्या कोरोना व्हायरसमध्ये डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2)आता एक आणखी म्युटेशन झालं आहे. या म्युटेशनसह 'डेल्टा प्लस' हा 'AY.1' व्हेरिएंट नावाने ओळखलं जातं.

डेल्टा व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये K417N म्युटेशन झाल्यानंतर हे डेल्टा प्लस व्हेरिएंट बनलं आहे. हे व्हेरिएंट आतापर्यंत भारतासह 10 देशात सापडलं आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंटवर अँटीबॉडी कॉकटेल देखील यशस्वी नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in