Exclusive : Delta व्हेरिएंटमुळेच देशात आणि महाराष्ट्रात Corona ची दुसरी लाट, अभ्यास अहवालात निष्कर्ष

जाणून घ्या या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे?
Exclusive : Delta व्हेरिएंटमुळेच देशात आणि महाराष्ट्रात Corona ची दुसरी लाट, अभ्यास अहवालात निष्कर्ष

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. भारतात आणि महाराष्ट्रात काय अवस्था होती ते आपण पाहिलंच आहे. अशात INSACOG आणि NCDC शास्त्रज्ञांनी केलेल्या सखोल अभ्यासानंतर एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. तो म्हणजे डेल्टा या व्हेरिएंटमुळेच भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली. या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आला आहे. राजधानी दिल्लीत सिरो पॉझिटिव्हीटी 56 टक्क्यांपेक्षा जास्त होती तरीही दिल्लीकरांना म्हणावं तसं संरक्षण या डेल्ट व्हेरिएंटविरोधात न मिळाल्याने तिथे कोरोना वाढला.

Exclusive : Delta व्हेरिएंटमुळेच देशात आणि महाराष्ट्रात Corona ची दुसरी लाट, अभ्यास अहवालात निष्कर्ष
Corona : भारतात आढळलेला स्ट्रेन ओळखला जाणार Delta या नावाने, WHO ने घेतला निर्णय

B.1.617 अर्थात डेल्टा व्हेरिएंटमुळे काय घडलं?

B.1.617 अर्थात डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोना झपाट्याने पसरला. तसंच या व्हेरिएंटमुळे कोरोना लवकर बरा होत नाही तर जास्त काळ राहतो. अल्फा या व्हेरिएंटपेक्षाही डेल्टा हा व्हेरिएंट जास्त घातक आहे. कोरोना रूग्णसंख्येचा उच्चांक गाठल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात केसेस कमी होऊ लागल्या होत्या दिल्लीत दिवसाला 9 हजारांपर्यंत रूगसंख्या कमी झाली होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्येही हे प्रमाण कमी झाले होते. मात्र डेल्टा व्हेरिएंटने कहर माजवला. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या केसेस दिल्लीत वाढण्यास सुरूवात झाली. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत हे प्रमाण 30 टक्के इतके वाढले होते. कारण दिल्लीत एप्रिल महिन्याच्या शेवटी दिवसाला 30 हजार रूग्ण पॉझिटिव्ह होत होते. यावरून या व्हेरिएंटची तीव्रता लक्षात येते.

Exclusive : Delta व्हेरिएंटमुळेच देशात आणि महाराष्ट्रात Corona ची दुसरी लाट, अभ्यास अहवालात निष्कर्ष
Covaxin बाबत आणखी माहिती मिळणं आवश्यक- WHO

Delta हा व्हेरिएंट ALPHA च्या तुलनेत 50 टक्के जास्त संसर्गजन्य

B.1.617 म्हणजेच डेल्टा व्हेरिएंट हा UK मधील ALPHA (B.1.1.7) व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त संसर्गजन्य होता असंही या अभ्यास अहवालात म्हणण्यात आलं आहे. सुरूवातीला असं दिसून आलं होतं की UK मधला व्हेरिएंट जास्त संसर्ग वाढवतो आहे. मात्र एप्रिल महिन्यात डेल्टा व्हेरिएंटने कहर केला आणि आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रासह भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला. फक्त रूग्णच वाढले असं नाही तर पॉझिटिव्हिटी रेटही वाढला.

(फोटो सौजन्य - PTI)

दरम्यान मृत्यूदरामध्येही या व्हेरिएंटमुळे असेच बदल झालेले पाहण्यास मिळाले. भारतात डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये मृत्यूदर कमी झाला होता. मात्र डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यूदरही वाढला.

महाराष्ट्राला डेल्टा व्हेरिएंटचा बसला फटका

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम हा फक्त दिल्लीवरच झाला असं नाही. तर केरळ, महाराष्ट्र आणि पंजाब यांनाही या व्हेरिएंटचा फटका बसला. जानेवारी 2021 पर्यंत केरळ राज्यात या व्हेरिएंटचा परिणाम दिसला नाही. मात्र महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये या व्हेरिएंटने मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले. दिल्लीसोबतच महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार झाला. त्यामुळे महाराष्ट्राला आणि पंजाबला या दुसऱ्या लाटेचा धोका जास्त प्रमाणात जाणवला.

Related Stories

No stories found.