Deltacron : ओमिक्रॉनपाठोपाठ आता डेल्टाक्रॉनची धास्ती, आढळले नवे 25 रूग्ण.. वाचा नव्या व्हेरिएंटबाबत...

वाचा नव्या व्हेरिएंटबाबत
Deltacron : ओमिक्रॉनपाठोपाठ आता डेल्टाक्रॉनची धास्ती, आढळले नवे 25 रूग्ण.. वाचा नव्या व्हेरिएंटबाबत...
आता डेल्टाक्रॉनचा नवा व्हेरिएंट

सध्या संपूर्ण जगावर कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरिएंटने थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनाच्या या दोन्ही व्हेरिएंटचे रूग्ण वाढले आहेत. अशात आता डेल्टॉक्रॉन (Deltacron) हा नवा व्हेरिएंट आढळल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांसारखी लक्षणं यात दिसतात त्यामुळे या व्हेरिएंटला डेल्टॉक्रॉन असं नाव देण्यात आलं आहे. सायप्रस या देशात डेल्टाक्रॉनचे 25 रूग्ण आढळले आहेत.

सायप्रसच्या बायोटेक्नॉलॉजी अँड मॉलिक्रुयलर वायरोलॉजी विद्यापीठाच्या प्रयोगशाळातेली प्रमुख डॉक्टर लियोनाडिओस कोस्त्रिकस यांनी याबाबत माहिती दिली आहे. सायप्रसमध्ये आढळून आलेल्या 25 रूग्णांपैकी 11 जणांना या व्हेरिएंटमुळे रूग्णालयात दाखल करावं लागलं होतं. 14 जणांची प्रकृती स्थिर होती. कोस्त्रिकस यांच्या मते रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णांपैकी म्युटेशनची फ्रिक्वेन्सी जास्त होती.

आता डेल्टाक्रॉनचा नवा व्हेरिएंट
Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका, WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

डेल्टा आणि ओमिक्रॉनपासून बनला आहे ‘डेल्टाक्रॉन’!

कोस्त्रिकस यांनी यावरही जोर दिला की या प्रकाराला डेल्टा प्रकारासारखीच अनुवांशिक पार्श्वभूमी आहे, तसेच यामध्ये ओमिक्रॉनमधील काही उत्परिवर्तन आहेत. सायप्रियटचे आरोग्य मंत्र्यांनी शनिवारी सांगितले की नवीन प्रकार सध्या चिंतेचे कारण नाही. नवीन प्रकार शोधल्याबद्दलही मंत्री महोदयांनी अभिमान व्यक्त केला. आरोग्यमंत्री म्हणाले की, डॉ. कोस्त्रिकस यांच्या टीमचे महत्त्वपूर्ण संशोधन आणि निष्कर्षाचा आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. जेरुसलेम पोस्टनुसार, हे संशोधन सायप्रसला आरोग्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आणेल, असे मंत्र्यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत, नवीन प्रकाराचे वैज्ञानिक नाव घोषित केलेले नाही.

कोस्त्रिकस म्हणतात की हा प्रकार अधिक प्रभावी आहे की अधिक संसर्गजन्य हे आपण नंतर पाहू. ओमिक्रॉनच्या तुलनेत डेल्टाक्रोन व्हेरिएंटचा किती परिणाम दिसून येतो हे संपूर्ण विश्लेषणानंतरच कळेल. तसे, माझे वैयक्तिक मत असे आहे की करोनाच्या अत्यंत संसर्गजन्य ओमिक्रॉन प्रकारापेक्षाही मागे राहील. जगातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत.

आता डेल्टाक्रॉनचा नवा व्हेरिएंट
Omicron: देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात

डेल्टाक्रॉन व्हेरिएंट नेमका काय?

सायप्रसमधील तज्ज्ञांच्या मते कोरोना विषाणूचा नवा वेरियंट डेल्टाक्रॉन हा वेगळा विषाणू नाही. तर, डेल्टा आणि ओमिक्रॉनचं मिळत जुळतं रुप आहे. मात्र, अद्याप जागतिक आरोग्य संघटनेनं याला परवानगी दिलेली नाही. डेल्टाक्रॉनमध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिअंटची लक्षणं आढळून आल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टासारखी लक्षणं आढळली असली तरी यासंदर्भात अजून अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही संघटनेनं डेल्टाक्रॉनला मंजुरी दिलेली नाही. डेल्टाक्रॉनला काही ठिकाणी डेल्मीक्रॉन देखील म्हटलं जातं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in