Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा कोरोनाची लागण?, पाहा शरद पवार काय म्हणाले

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुन्हा कोरोनाची लागण?, पाहा शरद पवार काय म्हणाले
deputy chief minister ajit pawar infected with corona again see what ncp chief sharad pawar said(फोटो सौजन्य: Twitter)

वसंत मोरे, बारामती

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, ही फक्त शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अद्याप त्यांचा कोरोना अहवाल आलेला नाही. मात्र, त्यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

'उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कदाचित कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता आहे. अद्याप त्यांचा कोरोना अहवाल आलेला नाही. आम्ही त्याच प्रतीक्षेत आहोत. खबरदारी म्हणून अजितदादा बारामतीतील कार्यक्रमात आज सहभागी झाले नाहीत. त्यांच्या घरातील दोन कामगार व गाडीचा चालक यांना देखील कोरोना झाल्यामुळे कोणताही धोका नको म्हणून ते आजच्या कार्यक्रमात सहभागी झाली नाही. येथे बरीच गर्दी असणार त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांनी येऊ नये. असे आम्ही त्यांना सांगितले.' अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंबीय आपल्या कार्यकर्त्यांना आणि बारामतीच्या नागरिकांची एका कार्यक्रमात भेटतात. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने याविषयी चर्चेला सुरुवात झाली होती. याचबाबत जेव्हा पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी याबाबतची नेमकी माहिती दिली.

शरद पवारांकडून राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा!

'कोरोनाच्या संकटामुळे काही पथ्य पाळावी लागत आहेत .राज्य सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. याचा परिणाम कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस कमी होते. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटावे का नाही असा संभ्रम होता. मात्र भेटीचा आनंद घेता आला पाहिजे.' असं पवार यावेळी म्हणाले.

deputy chief minister ajit pawar infected with corona again see what ncp chief sharad pawar said
...तुम्हाला बोललो की मग राग येतो ! जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फटकारतात

'समाधान आहे की आज मास्क लावून सोशल डिस्टंसिंग ठेवून शुभेच्छा घेतल्या, शुभेच्छा दिल्या. मागील कोरोनाच्या काळात पूर्ण आर्थिक नुकसान झाले ते भरून काढणे गरजेचे आहे. देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला अंतकरणापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो.' असं म्हणत शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in