'NCB ने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मुलाशी चांगले संबंध असलेल्या व्यक्तीला सोडून दिलं'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं वक्तव्य
'NCB ने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या मुलाशी चांगले संबंध असलेल्या व्यक्तीला सोडून दिलं'
देवेंद्र फडणवीस

NCB ने हे स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांनी अनेक लोकांना ताब्यात घेतलं होतं. ज्यांच्याकडे काही ड्रग्ज सापडलं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्यांच्याकडे काही सापडलं नाही त्यांना सोडून देण्यात आलं. ज्या लोकांना NCB ने सोडून दिलं त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा मुलाशी संबंधित एका व्यक्तीचा समावेश होता. ती व्यक्ती कोण ते सांगणार नाही कारण ती व्यक्ती क्लिन होती. अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एका चांगल्या संस्थेला बदनाम केलं जातं आहे. या प्रकरणातचं राजकारण करणं योग्य नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आर्यन खान
आर्यन खान (फाइल फोटो)

NCB ने क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आठ जणांना अटक केली. त्यामध्ये आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा ही बडी नावं आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही सगळी कारवाई म्हणजे बनाव असल्याचं म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या कार्यकर्त्याच्या मेहुण्याला सोडून देण्यात आलं असा आरोप केला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता NCB चांगलं काम करते आहे, त्या प्रकरणाचं राजकारण करायला नको. ज्या लोकांना ताब्यात घेतलं होतं त्यापैकी जे क्लिन होते त्यांना सोडून देण्यात आलं. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या मुलाशी संबंधित व्यक्तीही होती. मी त्याचं नाव घेणार नाही कारण ती व्यक्ती क्लिन आहे. नवाब मलिक हे सगळं का करत आहे असं विचारलं असता त्यांचं दुखणं वेगळं आहे हे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आता त्यावर वेगळं काही बोलणार नाही असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस
NCB म्हटलं की नवाब मलिक यांच्या पोटात का दुखतं सगळ्यांना माहित आहे-फडणवीस

नवाब मलिक यांचा आरोप काय?

क्रूझ पार्टीवर भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडून देण्यात आलं असा आरोप आज नवाब मलिक यांनी केला आहे. एवढंच नाही तर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावेत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. समीर वानखेडे मीडियाला हे सांगत आहेत की आठ ते दहा लोक होते. मात्र प्रत्यक्षात अकरा जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनाही ही माहिती सकाळपर्यंत मिळाली होती की एकूण 11 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र बातम्या अशा आल्या की आठ ते दहा लोकांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात तिघांना सोडून देण्यात आलं असाही आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. ऋषभ सचदेवा, प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आलं असा आरोप नवाब मलिक यांनी केला. भाजप नेत्यांनी फोन केल्याने या तिघांना सोडण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस
Nawab Malik On NCB 'क्रुझ पार्टीतून भाजप नेत्याच्या मेहुण्यासह तिघांना का सोडलं? समीर वानखेडेंचे कॉल तपासावेत'

NCB ने काय दिलं उत्तर?

2 ऑक्टोबरला जी कारवाई आम्ही केली त्यामध्ये आम्ही 13 लोकांना ताब्यात घेतलं होतं. तेरा पैकी पाच जणांच्या चौकशीत काहीही आढळलं नाही तसंच त्यांच्या वैदकीय चाचणीतही काहीच आढळलं नाही. एवढंच नाही तर त्यांच्याजवळ काहीही ड्रग्ज नव्हते त्यामुळे आम्ही त्यांना सोडून दिलं. आम्ही कोणाचाही धर्म, जात हे पाहून कारवाई करत नाही. जे दोषी असतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. ज्या आठ जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे ड्रग्ज सापडले म्हणून ही कारवाई केली. यासंदर्भातले जे पुरावे असतील ते आम्ही यापुढेही कोर्टात सादर करू. या प्रकरणात जे आरोप आमच्यावर करण्यात येत आहेत त्याला काहीही अर्थ नाही असं NCB ने स्पष्ट केलं आहे.

Related Stories

No stories found.