Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी 'बॉम्ब' फोडला, नवाब मलिकांवरचे 'ते' आरोप जसेच्या तसे

Devendra Fadnavis allegations against Nawab Malik: देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. जाणून घ्या त्यांनी केलेले आरोप जसेच्या तसे.
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी 'बॉम्ब' फोडला, नवाब मलिकांवरचे 'ते' आरोप जसेच्या तसे
devendra fadnavis allegations against nawab malik underworld connection kurla land deal bjp vs ncp(फोटो सौजन्य: Twitter)

मुंबई: राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी (9 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे अंडरवर्ल्डशी (Underworld) संबंध असल्याचे अत्यंत गंभीर आरोप (Serious Allegations) केले आहे. पाहा नवाब मलिक यांच्यावर फडणवीस यांनी नेमके काय आरोप केले आहे

फडणवीसांनी नवाब मलिकांवकर केलेले आरोप जसेच्या तसे...

'आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा विषय मी मांडतोय. पहिल्यांदा दोन व्यक्तींची माहिती मी आपल्याला देतोय. पहिले आहेत सरदार शाहवली खान. 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी हा सध्या जेलमध्ये आहे. त्याला जन्मठेप झाली आहे. काय आरोप होते याच्यावर.. फक्त आरोप नाही सिद्ध झालेले आरोप आहेत.'

'टायगर मेननच्या नेतृत्वात हे संपूर्ण कटात सहभागी होते. बीएसई आणि मुंबई महानगरपालिका बिल्डिंगची रेकी याने केली होती. तिथे बॉम्ब नेमका कुठे ठेवायचा. टायगर मेमनच्या ज्या इमारतीमध्ये हे संपूर्ण कारस्थान शिजलं त्या मीटिंगला ते स्वत: उपस्थित होते.'

'या बॉम्बस्फोटाची पूर्ण माहिती ही त्यांच्याजवळ होती. एवढंच नाही तर टायगर मेमनच्या अल-हुसैनी बिल्डिंगमध्ये ज्या ठिकाणी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं त्या ठिकाणी आरडीएक्स भरणारे हे लोकं होते. जे माफीचे साक्षीदार आहेत आणि जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत या दोघांनी यासंदर्भातील साक्ष दिल्यानंतर यांना जन्मठेप झाली आहे.'

'दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल. हे तेच व्यक्ती आहेत.. 2013-14 साल असेल ज्यावेळी आर. आर. पाटील साहेब हे एका इफ्तार पार्टीला गेलेले होते. त्यानंतर दाऊदच्या माणसासोबत त्यांचा फोटो आला तो दाऊदचा माणूस म्हणजे हे सलीम पटेल. आर. आर. पाटलांचा त्यात काहीही दोष नव्हता. पण हा फोटो आला आणि त्यांना ट्रोल व्हावं लागलं. सलीम पटेल म्हणजे ज्या हसीना पारकर.. दाऊद यांच्या भगिनी ज्यांना हसीना आपा म्हटलं जायचं. या हसीना आपाचा हा ड्रायव्हर, बॉडिगार्ड आणि फ्रंटमॅन होता.'

'हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातून जे लँड ग्रॅबिंग चालवायचा ते सगळं हसीना आपा पाहायची. यावेळी हसीना आपाचा फ्रंटमॅन ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटॉर्नी तयार व्हायच्या तो हाच सलीम पटेल.'

'कुर्ल्यात एलबीएस रोडवर जवळजवळ 3 एकरची जागा आहे. एका गोवावाल्या फॅमिलीची जागा होती. एलबीएस रोडवर अतिशय महागडी ही जागा होती. सलीम पटेलने एक त्यांची पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली. त्याचा काही भाग हा त्या दुसऱ्या शाहवली खानकडे आहे. आता सलीम पटेलने पॉवर ऑफ अटॉर्नी ही कोणाकरता घेतली हे सांगण्याची आवश्यकता नाही.'

'आपल्याला मी ही रजिस्ट्रीची कॉपी देत आहे. या कॉपीत स्पष्टपणे एलबीएस रोडवरची ही जागा जवळजवळ तीन एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. सॉलिडस प्रा. लिमिटेड यांच्यावतीने यावर सही केलेली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कंपनीची आहे. काही काळ.. छोटा काळ.. स्वत: नवाब मलिक देखील यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत.'

'सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की, सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे. केवळ 30 लाख रुपयांमध्ये. त्यातील पेमेंट केलेलं आहे फक्त 20 लाख रुपये.'

'आजही त्या ठिकाणी फार मोठं शेड भाड्याने दिलेलं आहे सॉलिडसने. माझी माहिती खरी-खोटी असेल मागे पुढे असेल पण मला जी माहिती आहे एक कोटी रुपये महिना त्यातून सॉलिडसला आजही भाडं मिळतंय. त्यामुळे ही जी सगळी जागा आहे त्यावेळेस तिथला रेट काय होता?'

'आपण जर बघितलं एलबीएस रोडवर नाही. त्याच्यामागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर मलिक कुटुंबाने एक 2005 मध्ये एक प्रॉपर्टी घेतली होती. ती त्यांनी 415 रुपये स्क्वेअर फूटने घेतली होती. याच एलबीएस रोडवर फोनिक्स मार्केट सिटी कुर्ला याची जमीन 2005 सालीच विकली गेली त्यावर भरपूर आरक्षणं देखील आहेत. ती 2050 रुपये स्क्वेअर फूटने विकली गेली आहे.'

'सॉलिडसने या दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जी जमीन घेतली आहे ती 25 रुपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. आणि पेमेंट 15 रुपये चौरस फुटाने केले. आता प्रश्न हा आहे की, पहिल्यांदा मुंबईच्या गुन्हेगारांकडून, मुंबईच्या हत्यारांकडून ही जमीन विकत घेण्याची काय आवश्यकता होती?... कोण आहे हा शाहवली खान?'

'ज्यावेळी मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा आपण माणसांच्या चिंधड्या झाल्याचं पाहिलं. या संपूर्ण स्फोटाचं प्लॅनिंग करणारा हा शाहवली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू म्हणून ज्याला आपण ओळखतो तो दाऊद त्याची बहीण आणि तिचा फ्रंटमॅन असलेला हा दुसरा सलीम पटेल. काय आवश्यकता होती?'

'या दोघांनी एवढी मोक्याची जागा तुम्हाला कवडीमोलाच्या भावाने का विकली? टाडा कायद्याच्या अंतर्गत त्यावेळी हे आरोपी होते आणि निकाल हा जवळच होता. 2007 साली याचा निकाल आला. नंतर सुप्रीम कोर्टाने देखील निकाल दिलाय.'

'टाडा कायदा लागल्यास आरोपी असो की, दोषी असो यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार हे सरकारला आहेत. त्यामुळे आपली संपत्ती सरकारजमा होऊ नये म्हणून या ठिकाणी विकली गेलीय. ही खरंच 20 लाखाला विकली गेलीय की, या लोकांच्या काळ्या कामाकरता मोठ्या प्रमाणात काळा पैसा दिला गेलाय?'

'चेकने एवढेच आणि नंतर कॅशने इतर कारण अंडरवर्ल्डच्या लोकांना चेकच्या पैशाचं फार विशेष प्रेम नसतं. त्यांच्या सर्व कारवायांसाठी त्यांना काळा पैसा लागतो. त्यामुळे कुठेतरी त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून किंवा काळा पैसा देऊन या ठिकाणी ही प्रॉपर्टी विकत घेण्यात आली आहे का? हा माझा सवाल आहे.'

'माझ्याकडे आता पाच प्रॉपर्टीचे डिटेल्स आहेत. त्यातील एकाचे कागदपत्र मी जमा करतोय. पण चार प्रॉपर्टीच्या बाबतीत मी खात्रीने सांगू शकतो की, त्याचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. सलीम पटेलसोबत केवळ या प्रॉपर्टीत नाही तर याच्यापुढे संबंध आहे.'

devendra fadnavis allegations against nawab malik underworld connection kurla land deal bjp vs ncp
'आम्हाला ती जागा 'अशी' मिळाली...' फडणवीसांच्या आरोपानंतर नवाब मलिकांनी सांगितली संपूर्ण कहाणी!

'त्यामुळे या ठिकाणी हे जे कागदपत्र माझ्याकडे आहेत ते मी संबंधित तपास यंत्रणेकडे देणार आहे. यासोबत मी सांगितल्याप्रमाणे या कागदपत्रांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देखील पाठवणार आहे. कारण त्यांनाही समजलं पाहिजे की, त्यांच्या नेत्यांचे नेमके काय प्रताप आहेत.' असे अनेक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांविरोधात केले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in