'भाजपनेच अमरावती हिंसाचार घडवला' या शरद पवारांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...

जाणून घ्या काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?
'भाजपनेच अमरावती हिंसाचार घडवला' या शरद पवारांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

अमरावतीमध्ये घडलेला हिंसाचार भाजपनेच घडवला असा आरोप शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. या आरोपांना आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला तो त्रिपुरात कुठलीही घटना घडली नसताना फक्त कपोलकल्पित माहितीच्या आधारे झाला. एक दिवस आधी जो मोर्चा निघाला होता त्यामध्ये हिंदूंची दुकानं फोडण्यात आली. याबाबत सेक्युलर नेते का बोलत नाहीत? प्रश्न काय आहे आणि तो कुणी निर्माण केला यापासून भरकटत जाऊन भाजपवर आरोप केल्याने प्रश्न सुटणार नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

अमरावती शहरात दगडफेक करताना समाजकंटक.
अमरावती शहरात दगडफेक करताना समाजकंटक.

काय म्हणाले होते शरद पवार?

धार्मिक तेढ आणि जातीयवादाला खतपाणी घालणारा विचार जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे सत्ताधारी करत आहेत. त्रिपुरात काही घडलं त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. नांदेड, अमरावती, मालेगाव या ठिकाणी याचे परिणाम झाले. तिथं काही घडलं तर त्याची किंमत इथल्या लोकांना का द्यावी लागावी? ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्या पक्षाच्या लोकांची एकंदर भूमिका या सर्व परिस्थिती तेल ओतून आग वाढवण्याची होती. याचा अनुभव अमरावतीत घेता आला. त्यामुळे सांप्रदायिक विचार, जातीयवादी विचार, दोन समाजांमध्ये अंतर आणि द्वेष वाढवण्याचा विचार करणाऱ्यांना खड्याप्रमाणे बाजूला करा. असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. आता त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

'भाजपनेच अमरावती हिंसाचार घडवला' या शरद पवारांच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, म्हणाले...
देशात सत्ताधारीच जातीयवादाला खतपाणी घालत आहेत, त्यांना खड्याप्रामाणे बाजूला करा-शरद पवार

भाजपच्या हातातून सत्ता गेल्याने केंद्रीय तपास यंत्रणांना यादी पाठवून कारवाईचे प्रकार केले जात आहेत अशीही टीका शरद पवारांनी केली होती. त्यावरही फडणवीस यांनी उत्तर दिलं. ' सध्या राष्ट्रवादी पक्षाची अवस्था झालेली आहे त्यामुळे त्यांना ती भूमिका घ्यावीच लागेल कारण ते पक्षाचे प्रमुख आहेत. ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी समर्थन केले ते आपण पाहिलं आहे. परमबीर सिंग मलाही म्हणाले होते. पैसे मागितले गेल्याचं बोलले होते.. पण पुढे काही कळलं नाही आता अशी वक्तव्य करून पाठिंबा देतात का? शरद पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी अपेक्षित नाहीत' असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in