'...मग सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात?', फडणवीसांचा CM ठाकरेंना खडा सवाल

मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? असा बोचरा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
devendra fadnavis criticized to cm uddhav thackeray and indirectly sharad pawar bjp vs shiv sena ncp
devendra fadnavis criticized to cm uddhav thackeray and indirectly sharad pawar bjp vs shiv sena ncp(फोटो सौजन्य: विधानसभा)

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. भाजप केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून हल्ले करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. यावेळी त्यांनी महाभारतातील काही दाखले देखील दिले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राईट ट रिप्लायदरम्यान बोलताना जोरदार हल्ला चढवला.

'या ठिकाणी शिखंडीचा देखील उल्लेख झाला. पण मला हे सांगा की, मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी ही अवलाद नाही. समोर लढणारे लोकं आहोत आम्ही.' अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

पाहा फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले:

'जे विषय मी मांडले त्यातल्या कुठल्याच विषयावर या ठिकाणी उत्तर आलं नाही. यशवंत जाधवांनी 24 महिन्यात 36 प्रॉपर्टी कशा कमवल्या याचं उत्तर आलं नाही. 29 कोटीच्या टॅब खरेदीचं उत्तर नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्याचं उत्तर देण्यात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी फक्त टोमणे लगावले. त्यांच्याकडे टोमणे बॉम्ब आहेत.'

'खरं म्हणजे.. 'राज पर पेहरा है, जख्म बहौत गहरा है.. लगता है बडी चोट खायी है, दर्द बनके बाते जबानपर आयी है' अशा प्रकारची अवस्था होती.'

'माझा एकच सवाल आहे. नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडनं जमीन खरेदी करणं त्याच्यासोबत सह्या करणं जो जेलमध्ये आहे, बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. अशा आरोपीकडून खोट्या कागदपत्रांवर.. याचं तरी समर्थन कसं केलं जाऊ शकतं.'

'मला दु:ख आहे. ते काही समर्थन करतील. पण इतके वर्ष त्यांच्यासोबत राहिल्यानंतर अशा गोष्टीचं समर्थन हे त्या ठिकाणी करतात. याचं मला खरोखर अतिशय दु:ख आहे.'

'मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, मेहबुबा मुफ्तीसोबत गेलात वैगरे. अरे बाबा ते तर जाऊदे.. हे खरंच आहे की, ओसामाला मारल्याच्या आधारावरच ओबामाला दुसरी मिळाली टर्म. पण त्यावर मी बोलणार नाही. पण एक गोष्ट सांगा की, अशाप्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नका असं पत्र लिहणारे तुमच्यासोबत बसले आहेत. मेहबुबा मुफ्तीच्या संदर्भात ज्या वेळी फुटीरतावाद्यांनी सांगितलं की निवडणुका घेऊ देणार नाही.'

'तेव्हा केंद्र सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या. फुटीरतावाद्यांनी तेव्हा सांगितलं की, निवडणुका झाल्या असल्या तरी सरकार बनवू देणार नाही. त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती म्हणून आम्ही मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार बनवलं. आम्ही आयएसआयला दाखवलं की, सरकार बनवू शकतो. पण त्यात राहिलो नाही. इथे निवडणुका होऊ शकतात हे जेव्हा आम्ही जगाला दाखवलं त्याच क्षणी आम्ही त्या सरकारला लाथ मारली लाथ.'

'आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभे राहू शकतो. आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभं राहायला. आणि ईडी म्हणजे घरगडी तुम्ही म्हणता. असं तुम्हाला याकरता वाटतं का? की, आता काही तुमचे घरगडी आहेत त्यांना ईडी बोलवतेय. उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का तुमच्या?'

'मी तर म्हणतो हे खरंय हे कुणीच घोषित करु नये की, उद्या कोण.. परवा कोण... पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित बाप-बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार.'

'खरं म्हणजे तुम्ही म्हणता आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर टीका करु नका. कोण करतंय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा तुमच्या मनात हा जो संभ्रम आहे ना तो काढून टाका, की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही.'

'या ठिकाणी शिखंडीचा देखील उल्लेख झाला. पण मला हे सांगा की, मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी ही अवलाद नाही. समोर लढणारे लोकं आहोत आम्ही. कपटाने राज्य हे कौरवांनी घेतलं होतं. पांडवांनी नाही. पण कपटाने राज्य घेतल्यानंतरही अर्जुन घाबरला नाही. आम्हीही घाबरत नाही.'

'खरं म्हणजे 72 तास तुम्ही आमच्यासोबत होतात त्यामुळे तुम्ही बरोबर मुख्यमंत्री बसल्याबरोबर चांगली कविता त्याठिकाणी म्हटलीत... उपयोग काय झाला.. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर उत्तर तुम्हीच दिलं. उपयोग काय झाला..'

devendra fadnavis criticized to cm uddhav thackeray and indirectly sharad pawar bjp vs shiv sena ncp
मुख्यमंत्र्यांजवळ जे टोमणे बॉम्ब आहेत त्याच्यापेक्षा खतरनाक बॉम्बच उरलेला नाही: फडणवीस

'आमचे प्रत्येक आरोप हे पुराव्यानिशी होतं. त्यामुळे यांच्याकडे उत्तरच नव्हतं म्हणून या ठिकाणी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं नाही. भाषण विधानसभेतलं होतं पण शिवाजी पार्कचं भाषण झालं.' असं जोरदार भाषण याठिकाणी फडणवीसांनी केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in