Exclusive: आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा इगो.. म्हणून मेट्रो-3 ची हत्या, फडणवीस प्रचंड संतापले!

Devendra Fadnavis attack on CM Thackeray: आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळेच मेट्रो-3 प्रोजेक्टची हत्या झाली आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
devendra fadnavis exclusive interview mumbai tak aditya and uddhav thackeray ego kills metro 3 project fadnavis angry
devendra fadnavis exclusive interview mumbai tak aditya and uddhav thackeray ego kills metro 3 project fadnavis angry(फोटो - मुंबई Tak)

मुंबई: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे या दोघांच्या इगोमुळे मेट्रो-3 प्रकल्पाची हत्या झालीए.. हो हत्याच झाली आहे.' अशी घणाघाती टीका करत माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रचंड संताप व्यक्त केला आहे. 'मुंबई Tak'ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्यांनी सरकारच्या दोन वर्षातील कारभाराची चिरफाड केली. याशिवाय अनेक राजकीय मुद्द्यांवर देखील भाष्य केलं. मात्र, यावेळी त्यांनी प्रामुख्याने मुंबई मेट्रो प्रकल्पावरुन शिवसेनेला थेट टार्गेट केलं.

पाहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले:

'मी तर म्हणेन मेट्रो-3 प्रकल्पाची हत्या केलीए या सरकारने हत्या. फक्त इगोकरता ही हत्या आहे. याचं कारण मेट्रो-३ मध्ये ही जी काही आरे कारशेडची जागा होती या संदर्भात सुप्रीम कोर्टाने निर्णयात असं म्हटलं आहे की, त्या आरे कारशेडच्या जागेवर जेवढी झाडं होती या झाडांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन मिळवलं असतं तेवढं मेट्रो 80 दिवसात करेल. त्यामुळे कोर्टाने परवानगी दिली आणि झाडं कापण्यात आली.

'400 कोटी रुपयांचं काम होतं त्यापैकी 100 कोटी रुपयांचं काम पूर्ण झालं. 300 कोटी रुपयांचं काम पूर्ण होऊन मेट्रो सुरु होऊ शकली असती. केवळ तुमच्या इगोखातर तुम्ही त्या ठिकाणाहून तो कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवला.'

'बरं कारशेड अशा ठिकाणी हलवलं की, तुमचेच मुख्य सचिव कमेटीचे चेअरमन असताना इथे शक्य नाही असं आमच्या काळात सांगितलं. तुम्ही कमेटी तयार केली.. तुमच्या कमेटीनेही सांगितलं की शक्य नाही. मग कशाकरता? म्हणजे इगोकरताच ना..'

'आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या इगोमुळे मेट्रो-3 प्रकल्पाची हत्या झाली आहे. मी सभागृहात देखील बोललो आहे. केवळ आणि केवळ इगोकरता. याठिकाणी एक भूमिका आम्ही घेतली आणि ठाकरे भूमिका कशी बदलतील?...'

'अरे हात जोडतो बाबा... मुंबईकरांकरता तयारी आहे आमची असंही सांगितलंय. पण हे मुंबईकरांना वेठीस का धरतात? हा प्रोजेक्ट डेडलाइनवर होणार नाही. संपला हा प्रोजेक्ट.'

'उद्या जर ते म्हणतायेत तिथे जर कारशेड नेलं.. तर दोन्ही कमिटींचा अहवाल आहे की, जमीन मिळविण्यासाठीच दोन वर्ष जाईल. नंतर दोन वर्ष त्याच्या बांधकामासाठी जातील. म्हणजे चार वर्ष आता या प्रोजेक्टसाठी जाईल.'

'ज्या जमिनीवर ठाकरे सरकार कारशेड उभारण्याबाबत बोलत आहे त्याच जमिनीसाठी मी 2015 साली गेलो होतो हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की, प्रायव्हेट पार्टीला 2500 कोटी द्या... तेव्हा, त्यामुळे त्याचा दावा तेव्हा मान्य केला होता हायकोर्टाने. त्यामुळे आता केवळ केंद्र आणि राज्य यात पार्टी नाहीए.'

'हे MMRDA च्या बापाचे पैसे आहेत का? हा जनतेचा पैसा आहे. असा कसा घालवता येईल. असा कसा दुसऱ्याच्या घशात घालता येईल तो? जे 400 कोटीचं काम हे तुमच्या मोफतच्या जमिनीवर होतंय. जिथे 100 कोटीचं काम झालं देखील आहे त्याऐवजी 3-4 हजार कोटी फक्त जमिनीसाठी देणार.'

devendra fadnavis exclusive interview mumbai tak aditya and uddhav thackeray ego kills metro 3 project fadnavis angry
'जाऊ तिथे खाऊ हे या भ्रष्टाचारी सरकारचं धोरण' देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकारवर टीकेचे बाण

'म्हणजे तुम्ही काही तरी भूमिका घेणार.. तुम्ही महान आहात.. पर्यावरण वैगरे नाही. पर्यावरणाचा निकाल हा स्वत: सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालामुळे तुम्ही डिले करता आहात. उलट मुंबईतील जे प्रदूषण आहे ते तुमच्या निर्णयामुळे वाढतं आहे.'

'इगो सोडला तरच हा प्रोजेक्ट मार्गी लागेल. आरेमधील झाडं तुटलेली आहेत. 100 कोटीचं काम झालेलं आहे. 300 कोटीचं काम केलं की, आपण आठ ते नऊ महिन्यात काम सुरु करु शकतो.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. फक्त आपल्या इगोकरता त्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं असंही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in