Devendra Fadnavis: गोवा कसं राखणार?, फडणवीस ठरवणार विधानसभा निवडणुकीची रणनीती

Devendra Fadnavis in Goa: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी नवनियुक्त निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे गोवा दौऱ्यावर गेले आहेत.
Devendra Fadnavis: गोवा कसं राखणार?, फडणवीस ठरवणार विधानसभा निवडणुकीची रणनीती
Devendra Fadnavis to visit goa today to monitor the preparation of BJP for Upcoming election(फोटो सौजन्य - Twitter)

पणजी: गोव्याचे नवनियुक्त निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे आज (20 सप्टेंबर) गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते 2022 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा केली. दरम्यान यावेळी केंद्रीय सांसस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी आणि रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश या देखील सह प्रभारी म्हणून या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. पुढील दोन दिवसात ते गोव्याचा दौरा करणार असून भाजपसाठी निवडणुकीची व्यूहरचना आखणार आहेत.

दरम्यान, याबाबत प्रवक्त्यांनी अशी माहिती दिली की, 'वरिष्ठ नेते पुढील 3-4 महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकूण परिस्थितीचा आढावा घेतील. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजप नेत्यांची टीम ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कॅबिनेट मंत्री आणि पक्षातील आमदारांशी चर्चा करतील.'

भाजपचे प्रवक्ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी महाराष्ट्राचे यशस्वी नेतृत्व केले आहे. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा व्यापक अनुभव गोव्यातील भाजपसाठी उपयुक्त ठरेल.'

देवेंद्र फडणवीस यांची ओळख ही अभ्यासू नेते अशी आहे. त्यामुळेच त्यांच्यावर आता गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात मोठा राजकीय पेच पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र, भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अनेक डावपेच आखून गोव्यातील आपली सत्ता कायम ठेवली होती. तेव्हापासून गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ही डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच आहे.

दरम्यान, गोव्यात भाजपला खरी ओळख मनोहर पर्रिकर यांच्यामुळेच मिळाली. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण आता भाजप पहिल्यांदाच पर्रिकरांशिवाय विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अशावेळी निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीसांवर देखील अधिक जबाबदारी असणार आहे.

फडणवीस यांचा निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव गोव्यातील भाजपसाठी फायदेशीर ठरु शकतो म्हणून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. भाजपने गेल्या वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती.

Devendra Fadnavis to visit goa today to monitor the preparation of BJP for Upcoming election
राजकारण हा सिरीयस बिझनेस, कोण काय बोललं यावरुन लगेच अंदाज बांधू नका - देवेंद्र फडणवीस

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी घेतली अमित शहा यांची भेट

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांची भेट घेतली होती. गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित होते. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन प्रमोद सावंत यांनी गोव्यातील निवडणुकीविषयी त्यांच्याशी चर्चा देखील केली होती. राजकीय परिस्थितीवर आम्ही चर्चा केली, असे ते म्हणाले होते.

Related Stories

No stories found.