Goa Election: गोव्यातील भाजपच्या विजयानंतर फडणवीसांनी दिली प्रचंड मोठी बातमी...

गोव्यातील भाजपच्या मोठ्या विजयानंतर सत्तास्थापने महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने आपल्या पाठिंब्याचं पत्र भाजपला दिलं असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
devendra fadnavis informed maharashtrawadi gomantak party given its letter of support bjp after big victory of  in goa
devendra fadnavis informed maharashtrawadi gomantak party given its letter of support bjp after big victory of in goa(फाइल फोटो)

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत तब्बल 20 जागा जिंकून भाजपने प्रचंड मोठं यश मिळवलं आहे. भाजपसाठी गोव्यातील हा विजय अत्यंत महत्त्वाचा समजला जाता आहे. मागील निवडणुकीत अवघ्या 13 जागा मिळवणाऱ्या भाजपने यावेळेस थेट बहुमत मिळवलं आहे. मात्र असं असलं तरीही भाजप सत्ता स्थापन करताना इतरांचा देखील पाठिंबा घेणार आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने देखील भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. अशी माहिती स्वत: गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर गोव्यात पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने पाठिंब्याचं पत्र देखील दिलं आहे. गोव्यात भाजपविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या MGP ने निकालांचा कल पाहून तात्काळ आपला पाठिंबा भाजपला जाहीर केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पाहा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले:

'हा विजय आमचे नेते नरेंद्र मोदी यांना समर्पित आहे. याचं कारण संपूर्ण देशामध्ये मोदींनी विश्वासाहार्तेची जी मालिका सुरु केली त्यामुळेच गोव्यासहीत चारही राज्यामध्ये एक प्रचंड मोठा विजय हा प्राप्त झाला. त्याचवेळी डबल इंजिनचं सरकार हे लोकांनी गेल्या पाच वर्षात गोव्यात अनुभवलं. त्यामुळे गेल्या 5 वर्षात गोव्याचा चेहरा बदलला. गोव्याच्या जनतेने भाजपला प्रचंड मतं दिली. त्यामुळे 20 जागा या भाजपच्या निवडून आल्या.'

'मला हे सांगताना आनंद होत आहे की, तीन अपक्षांनी भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. आम्ही कालच हे सांगितलं होतं की, आमचे 21 आले तरीही आम्ही काही लोकांना आमच्यासोबत घेऊन चालणार आहोत त्याच परंपरेनुसार हे तीन अपक्ष असतील किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने देखील भाजपला त्यांच्या समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे MGP देखील आमच्यासोबत असणार आहे. मी एमजीपीचं देखील आभार मानतो. 25 लोकांच्या बहुमताने आम्ही सरकार स्थापन करु.'

'आता आमच्या सेंट्रल पार्लामेंट्री बोर्डाची बैठक होईल. त्या बैठकीत चारही राज्य म्हणजे गोव्याकरिता देखील निरिक्षक नेमले जातील. त्यानंतर विधीमंडळांची बैठक होऊन आम्ही राज्यपालांकडे जाऊ. आम्हाला बहुमत मिळाल्यामुळे आम्हाला धावपळ करण्याची गरज नाही.'

devendra fadnavis informed maharashtrawadi gomantak party given its letter of support bjp after big victory of  in goa
गोव्याच्या 'राज ठाकरें'चा वाघ आता विधानसभेत, म्हणाले तो गरजणार...

फडणवीसांनी उडवली काँग्रेसची खिल्ली

काँग्रेस पक्षाला असं वाटत होतं की, त्यांनाच बहुमत मिळेल म्हणून त्यांनी कालच राज्यपालांना पत्र देऊन आज तीन वाजेची वेळ घेतली होती. पण आज तीन वाजता कोणीच तिथे गेलं नाही. कारण जाण्यालायक त्यांच्याकडे काही वाचलंच नाही. त्यामुळे राज्यपाल साहेब वाटच पाहत होते की, कोण येतंय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in