Devendra Fadnavis: नवाब मलिकांच्या खळबळजनक आरोपाला अखेर फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले..

Devendra Fadnavis reaction on Nawab Malik allegations: नवाब मलिकांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendra Fadnavis: नवाब मलिकांच्या खळबळजनक आरोपाला अखेर फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले..
devendra fadnavis reaction nagpur nawab malik serious allegations underworld riyaz bhati bjp ncp

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी (10 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांच्या याच आरोपाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपलं मत व्यक्त केलं आहे.

नवाब मलिक यांनीची पत्रकार परिषद संपल्यानंतर भाजपच्या आशिष शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन मलिकांवर तुफान टीका केली. एवढंच नव्हे तर मलिक यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध आहेत हे देखील शेलारांनी सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याबाबत देवेंद्र फडणवीसांची मात्र, प्रतिक्रिया समोर आली नव्हती. ते आज एका कामानिमित्त नागपूरमध्ये आले होते. त्यावेळी नागपूर विमानतळावर त्यांना पत्रकारांनी गाठलं. यावेळी त्यांना नवाब मलिकांच्या आरोपाबाबत देखील त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली.

पाहा नवाब मलिकांच्या 'त्या' आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

'मला असं वाटतं की, माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलारांची प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा त्याला जास्त काही वजनही नाही. त्यामुळे त्याला कशाला वजन देता.' अशी त्रोटक प्रतिक्रिया देत फडणवी यांनी याबाबत अधिक काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

नवाब मलिक यांनी कोणते आरोप केले?

'देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं की, रियाज भाटी कोण आहे? तो बनावट पासपोर्टसह पकडला गेला होता. तो दाऊद इब्राहिमचा खास माणूस आहे. हाच रियाज भाटी डबल पासपोर्टसह पकडला गेला होता. पण अवघ्या दोन दिवसात तो सुटला. खरं तर तो भाजपच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील दिसायचा. एवढंच नव्हे तर फडणवीसांच्या डिनर टेबलवर देखील त्यांच्या सोबत होता.'

'यापुढे जाऊन मी सांगतो की, मला पंतप्रधानांवर आरोप करायचे नाहीत. पण तो देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात कसा पोहचला. पंतप्रधांनाकडे जाण्याआधी संबंधित व्यक्तीची संपूर्ण तयारी होते. अशावेळी तो थेट पंतप्रधानांना भेटून त्यांच्यासोबत फोटो कसा काय काढू शकतो?' असे अनेक गंभीर सवाल मलिकांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

devendra fadnavis reaction nagpur nawab malik serious allegations underworld riyaz bhati bjp ncp
Who is Riyaz Bhati: कोण आहे रियाझ भाटी, काय आहे दाऊदशी कथित लिंक? नवाब मलिक-फडणवीसांमध्ये जुंपली

'बनावट नोटांच्या व्यवसायाशी फडणवीसांचं कनेक्शन'

नवाब मलिक यांनी एक दुसराही आरोप फडणवीसांवर केलेला आहे. त्यांनी यावेळी असं म्हटलं की, 'जेव्हा 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाली तेव्हा पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, बनावट नोटा, काळा पैसा या सगळ्या गोष्टी उखडून फेकण्यासाठी नोटाबंदी करत असल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर संपूर्ण देशात अनेक ठिकाणी बनावट नोटा पकडण्यात आल्या होत्या. पण 8 ऑक्टोबर 2018 पर्यंत महाराष्ट्रात एकही बनावट नोट पकडण्यात आली नाही. कारण की, देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या आशीर्वादाने इथे बनावट नोटांचा खेळ हा सुरुच होता.'

मलिक पुढे म्हणाले '8 ऑक्टोबर 2017 रोजी एका छापेमारीत 14 कोटी 56 लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडण्यात आल्या पण ते प्रकरण देवेंद्र फडणवीस यांनी दाबून टाकलं. यामध्ये इमरान आलम शेख, रियाज शेख यांना पकडण्यात आलं. पण नंतर ही जप्ती फक्त 8 लाख 80 हजारांची असून ते प्रकरण देखील दाबण्यात आलं.' असे अनेक आरोप मलिकांनी फडणवीसांविरोधात केले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in