"बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख म्हणजे त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही"

Devendra fadnavis Tweet : "मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत."
"बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख म्हणजे त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही"
बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.twitter

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालं. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आठवणींना उजाळा दिला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाबासाहेबांसोबतच्या आठवणींचं स्मरण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

"प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत."

बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.
"सावरकर मला म्हणाले, 'फक्त लोकांच्या नकलाच करू नकोस"; बाबासाहेबांनी सांगितलेला किस्सा

"तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच! नुकतेच त्यांचे 100 व्या वर्षात पदार्पण झाले, तेव्हा त्या सोहोळ्याला आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याचा योग आला आणि आज ते आपल्यात नाहीत. विश्वासच बसत नाही. बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. 'राजा शिवछत्रपती'सारखा चरित्रात्मक ग्रंथ, 'जाणता राजा' महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा!"

बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.
...यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानलं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

"बाबासाहेबांची सर्वांत मोठी ओळख कोणती तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता."

"ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in