'ती' अस्वस्थता नव्हती तर मग काय होतं? देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना खोचक सवाल

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या टीकेला दिलं उत्तर
'ती' अस्वस्थता नव्हती तर मग काय होतं? देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना खोचक सवाल

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका करत देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येईन वरून टोले लगावले. एवढंच नाही तर माझी सत्ता गेली तेव्हा मी अस्वस्थ झालो नव्हतो. मी तर मॅच बघायला गेलो होतो असं म्हणत हसत हसत त्यांनी फडणवीसांना सुनावलं. याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला तेव्हा फडणवीस यांनीही खोचक प्रश्न विचारत शरद पवारांना उत्तर दिलं आहे.

'ती' अस्वस्थता नव्हती तर मग काय होतं? देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना खोचक सवाल
'माझं सरकार कोसळलं त्यादिवशी मॅच बघायला गेलो होतो'; पवारांचं फडणवीसांच्या वर्मावर बोटं

काय म्हणाले होते शरद पवार?

"हे खरं आहे की सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. हे काही नवीन भाग नाही. सगळेच काही माझ्यासारखे नसतात. मला आठवतंय की, १९७८-८० मध्ये माझं सरकार बरखास्त केलं गेलं. हे मला मुख्य सचिवांनी रात्री १२.३० वाजता सांगितलं. १२.३० वाजता तीन-चार मित्रांना बोलवलं आणि घरातील सामान आवरायला घेतलं. सकाळी ७ वाजता मी दुसऱ्या जागेत राहायला गेलो. त्या दिवशी इग्लंडविरुद्ध भारताचा सामना होता. मी वानखेडे स्टेडियमवर सामना बघायला गेलो. क्रिकेटचा आनंद घेतला."

"सत्ता येते-जाते. त्यामुळे आपण इतकं अस्वस्थ होण्याची गरज नाही. पण हल्ली काही लोक फार अस्वस्थ आहेत आणि त्यांना मी दोष देऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच त्यांनी मी येणार... येणार घोषणा केल्या आणि ते घडू शकलं नाही, त्यामुळे अस्वस्थता आहे. आमच्या स्नेहाने काय परिणाम होतात हे लक्षात येईल. इथं योग्य वातावरण निर्माण करायला त्यांचंही सहकार्य लागेल,"

जेव्हा गोष्टी जुन्या होतात तेव्हा लोकं विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात. सरकार कुणी पाडलं? मग पुन्हा काँग्रेसमधे कोण गेलं? या सगळ्याचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे. सरकार पाडायचं, काँग्रेसमधून बाहेर पडायचं मग परत काँग्रेसमध्ये जायचं हे सगळं अस्वस्थतेतूनच तर होतं. जो माणूस स्वस्थ बसला आहे आणि मॅच पाहतोय तो थोडंच असं करतो? काळजीचं कारण नाही. मी एकाच पक्षात आहे आणि माझा पक्ष सत्तेवर येणार आहे याचा मला विश्वास आहे असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिलं आहे.

शरद पवार यांनी आत्तापर्यंत अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आजही त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर टीका केली मी मुख्यमंत्री असताना माझीही सत्ता गेली तेव्हा मी अस्वस्थ झालो नव्हतो असं उदाहरण शरद पवार यांनी दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Related Stories

No stories found.