... तर आर्यन खान निर्दोष असल्याचंच सिद्ध होतं; गृहमंत्री वळसे-पाटील यांचं मोठं विधान

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटच्या जामीनावरील निकालपत्रामुळे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह... दिलीप वळसे-पाटील यांनी साधला निशाणा
... तर आर्यन खान निर्दोष असल्याचंच सिद्ध होतं; गृहमंत्री वळसे-पाटील यांचं मोठं विधान
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आर्यन खान.

कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. आर्यन खानसह तीन जणांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला असून, ते निकालपत्र समोर आलं. एनसीबीने केलेल्या काही आरोपांबद्दल न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं असून, यावर आता राज्याचे दिलीप वळसे-पाटील यांनी भूमिका मांडली आहे.

अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एनसीबीच्या कारवाईवरच शंका उपस्थित केली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने तसे मत नोंदवले असेल, तर हे षडयंत्र असल्याचंच दिसत आहे, असंही वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आर्यन खान.
आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी झाल्याचं हायकोर्टाच्या 'त्या' आदेशाने स्पष्ट केलं, नवाब मलिक यांचा आरोप

दिलीप वळसे-पाटील काय म्हणाले?

"न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केलेली असेल किंवा तसे विचार व्यक्त केले असतील, तर हेच सिद्ध होतं की तो (आर्यन खान) निर्दोष आहे. मी पक्षाचं नाव घेणार नाही. परंतु या माध्यमातून निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारची कामगिरी या केंद्रीय यंत्रणेनं केलेली आहे", असं म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एनसीबीच्या कारवाईवर निशाणा साधला आहे.

हे षडयंत्र आहे असं वाटतं का? असा प्रश्नही दिलीप वळसे-पाटील यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, "असं आता वाटायला लागलं आहे. परंतु अजून तपासातून ते पुढे येईल. जर पुरावे नसल्याचं न्यायालय म्हणत असेल आणि क्लीन चीट दिली, तर हे का करण्यात आलं, याची चौकशी करावी लागेल", असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आर्यन खान.
समीर वानखेडेंच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका, सेवेतून बरखास्त करण्याची मागणी

न्यायालयाने काय म्हटलंय?

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही. षडयंत्र किंवा कट रचल्याचेही पुरावे आढळले नाहीत. व्हॉट्स अॅप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह नाही', असं मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देताना म्हटलेलं आहे.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्यात कट रचला गेला होता, हे सिद्ध करण्यासाठी NCB सकारात्मक पुरावे गोळा करण्यात आणि परिस्थितीजन्य पुरावे दाखवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. त्यामुळेच या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला, असंही कोर्टाने म्हटलेलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in