Diwali 2021 : दिवाळी पूजेसाठी हा मुहूर्त आहे खास, जाणून घ्या वेळ आणि पूजेचं साहित्य

Diwali 2021 Puja Vidhi, Muhurat: कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिनी आज देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे... पूजेसाठी कोणती वेळ चांगली, पूजेचा विधी आणि साहित्याबद्दल...
Diwali 2021 : दिवाळी पूजेसाठी हा मुहूर्त आहे खास, जाणून घ्या वेळ आणि पूजेचं साहित्य
Diwali 2021 Puja Vidhi, Muhurat : दिवाळी पूजेसाठी मुहूर्त AajTak

देशभरात आज कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिनी देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. आजच्याच दिवशी 14 वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले होते. त्यांच्या श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या स्वागतासाठी अयोध्येत सर्वत्र दिवे लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं, असं सांगितलं जातं. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा आजच्याच दिवशी वध केला होता, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पूजा केली जाते.

दिवाळीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता?

आज दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात (सूर्यास्त झाल्यानंतर आणि रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी म्हणजे प्रदोष काळ) लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते. रुढीनुसार या काळात आई लक्ष्मीची पूजा केल्यास मनुष्याला दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही. पंचागांनुसार लक्ष्मीची पूजा अमावस्येच्या तिथीनुसार सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 4 मिनिटांपर्यंत करता येईल. अमावस्या आज सायंकाळी 6 वाजून 3 मिनिटांपासून ते 5 नोव्हेंबर रोजी रात्री 2 वाजून 44 मिनिटांपर्यंत असेल.

AajTak

पूजा करण्यासाठीची वेळ

लक्ष्मी पूजा शुभ मुहूर्त : सायंकाळी 6 वाजून 29 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 4 मिनिटांपर्यंत. (1 तास 55 मिनिटांचा कालावधी)

लक्ष्मी पूजा निशिता काळ मुहूर्त : रात्री 11.39 वाजेपासून ते रात्री 12.31 वाजेपर्यंत (5 नोव्हेंबर).

प्रदोष काळ : 5 वाजून 34 मिनिटांपासून ते 8 वाजून 10 मिनिटांपर्यंत.

वृषभ काळ : 6 वाजून 10 मिनिटांपासून ते 8 वाजून 6 मिनिटांपर्यंत.

शुभ चौघडिया मुहूर्त

प्रात: काळ : सकाळी 6 वाजून 34 मिनिटांपासून ते 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत.

सायंकाळ मुहूर्त : 4 वाजून 11व्या मिनिटापासून ते रात्री 8 वाजून 49व्या मिनिटापर्यंत.

AajTak

दिवाळीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य

लक्ष्मीपूजनात देवी आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती किंवा तसबिरीसह हळद-कुंकू, अक्षता, विड्याचे पान, सुपारी, श्रीफळ, लवंग, वेलची, धूप, कापूर, अगरबत्ती, दीपक, कापूस, धागा, पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर), गंगाजल, गुळ, धने, ऋतुकालोद्भव फळे, फुले, जव, गहू, दूर्वा, चंदर, शेंदूर, सुकामेवा, लाह्या, बत्तासे, यज्ञोपवीत, वस्त्र, अत्तर, चौरंग, कलश, कमल पुष्प माला, शंख, आसन, पूजाथाळी, चांदीची नाणी, आंब्याची डहाळी, नैवेद्य, असे पूजा साहित्य लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in