Diwali 2021: दिवाळी शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

Whatsapp Quotes on Diwali 2021: दिवाळी हा सर्व सणांमधील अत्यंत महत्त्वाचा सण समजला जातो. सलग पाच दिवस साजरा केला जाणाऱ्या या सणाचा आनंदच काही निराळा असतो. याचनिमित्ताने द्या खास शुभेच्छा.
Diwali 2021: दिवाळी शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes
Diwali 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi

Diwali 2021 whatsapp Marathi wishes and Messages: दिवाळी (Diwali) हा सर्व सणामधील सर्वात महत्त्वाचा आहे. अवघ्या देशात दिवाळी सण साजरा केला जातो. वर्षातील अत्यंत महत्त्वाचा सण अशी दिवाळीची ओळख आहे. घरोघरी दिवे आणि रोषणाई करुन हा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळी (Diwali) 1 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान आहे.

दिवाळी या सणाला हिंदू धर्मात खूपच महत्त्व आहे. दरवर्षी या दिवशी अनेक ठिकाणी दिवाळ पहाटचं आयोजन केलं जातं. पण कोरोना संकटामुळे यंदाही दिवाळी पहाट किंवा तत्सम कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार नाहीत. दरम्यान, जरी दिवाळी पहाट साजरी केली जाणार नसल्याने आपण आपल्या सर्व मित्र-मंडळीना एकत्र भेटू शकत नाही. पण आपण आपल्या मित्रमंडळींना दिवाळी शुभेच्छा नक्कीच देऊ शकता.

दिवाळी सणाचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनेक शुभकार्य देखील पार पडतात. अशा या सणाला अनेक जण खास शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी देखील जातात. पण सध्याच्या काळात हे अनेकांना शक्य होतं नाही. म्हणून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छा पाठवतात. आपणही आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-परिवाराला या खास शुभेच्छा पाठवू शकतात.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

संपू दे अंधार सारा

उजळू दे आकाश तारे

गंधाळल्या पहाटेस येथे

वाहू दे आनंद वारे....

दीपावलीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

दीपावलीच्या या मंगलमय पर्वात आपल्या सर्वांना अक्षय सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो

दीपावलीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

या देवि सर्व भुतेषू लक्ष्मी रूपेण संस्थिता

नमस्तयै, नमस्तयै, नमस्तयै नमो नम: ॥

दीपावलीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

ही दीपावली आपणांस व आपल्या परिवारास आनंदमयी, आरोग्यदायी,सुखमय, वैभवशाली जावो, ही सदिच्छा !

दीपावलीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपणां सर्वांचा दिवाळी सण खास..!

दीपावलीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

Diwali 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi
Happy Naraka Chaturdashi 2021: नरक चतुर्दशीनिमित्त Facebook-Whatsapp मेसेज, Wishes आणि शुभेच्छा

सध्या कोरोनाचं संकट कमी झालेलं असलं तरी ते पूर्णपणे संपलेलं नाही. त्यामुळे सरकारकडून काही निर्बंध कायम आहेत. अशात जर आपल्याला कोरोनाचा समूळ नायनाट करायचा असेल तर सरकारकडून जारी करण्यात आलेले नियम पाळणं गरजेचं आहे. त्यातही महत्त्वाचा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी जर आपण जर बाहेर पडू शकत नसाल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवाळीाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Diwali 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi
Laxmi Pooja 2021: लक्ष्मीपूजनानिमित्त शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

सोशल मीडियामुळे आता आपल्याला शुभेच्छा पाठविण्यसाठी WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचद्वारे आपण Messages आणि Wishes पाठवू शकतात. यासाठी काही खास मराठी शुभेच्छा असलेले कार्ड (Diwali 2021 wishes and Quotes) आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छा मेसेज आपण एकमेकांना पाठवू शकतात.

दिवाळी सणानिमित्त 'मुंबई तक'कडून देखील आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in