आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?-नारायण राणे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनच्या पायऱ्यांवरून जात असताना तिथे भाजपचे आमदार आंदोलन करत होते. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढला. हे प्रकरण अधिवेशनात चांगलंच गाजलं. भास्कर जाधव यांनी यावरून नितेश राणेंच्या निलंबनाचीही मागणी केली. आता या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंना ‘म्याव म्याव’ चिडवणं भोवणार?

काय म्हणाले नारायण राणे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आदित्य ठाकरे यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली? असा प्रश्न नारायण राणेंनी विचारला आहे. मांजराचा आवाज कोण काढतं? आदित्य ठाकरेंचा काही संबंध आहे का? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्यावर करतं. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे आणि ते तसं बोलतात का? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे.

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळेच नितेश राणेंना एका प्रकरणात अडकवण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे असाही आरोप नारायण राणेंनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणा भाजप आमदार नितेश राणेंविरोधात वॉरंट निघाला. नितेश राणेंना अटक करण्यात यावी यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणेंवर कारवाईची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी शोध घेत आहेत. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले, ‘ पोलीस एवढे का आले याची माहिती घ्या. काय टेररिस्ट आले की पाकिस्तानातून कोणी आलं? एक खरचटलं… मारहाण झाली मग एवढे पोलीस का? अशा घटना घडत असतात. नितेश राणेंचा संबंध नाही मारहाणीशी. नाव गोवायचं आणि 307 लावायचं, निवडणूक संपेपर्यंत डांबून ठेवायचं असा यांचा प्लॅन आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT