Dombivli Gang Rape: 'घटना गंभीर आणि घृणास्पद', कोर्टाने 21 आरोपींची पोलीस कोठडी वाढवली

Dombivli Minor Gang Rape: डोंबिवली अल्पवयीन गँगरेप प्रकरणी कोर्टाने 21 आरोपींच्या पोलीस कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.
Dombivli Gang Rape:  'घटना गंभीर आणि घृणास्पद', कोर्टाने 21 आरोपींची पोलीस कोठडी वाढवली
Dombivli Minor Gang Rape

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली

डोंबिवलीत एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सुमारे 33 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. यापैकी आज 21 आरोपींना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने या सर्व आरोपींच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ केली असून त्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पहाडे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाड्या व इतर तपासासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपींच्या वकिलांकडून यावर हरकत देखील घेतली. मात्र ही घटना गंभीर आणि घृणास्पद असल्याचं सांगत कोर्टानं आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आतापर्यंत सुमारे 7 वकिलांनी आरोपींचे वकीलपत्र घेतले असून रचना भोईर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच आरोपींच्या नातेवाइकांसह इतरांना कोर्ट परिसरातून बाहेर काढण्यात आलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

साधारण जानेवारीत महिन्यात पीडित मुलीच्या प्रियकराने तिच्यावर शारीरिक अत्याचार करत त्याचा व्हिडीओ काढला होता. नंतर याच व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करुन आरोपींनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पीडित मुलीने नेमका काय दिलाय जबाब?

'त्या मुलांनी माझा विविस्त्र आणि शारिरीक संबंध असलेला व्हीडिओ शूट केला होता. हा व्हीडिओ व्हायर करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार करण्यात आले. मला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं. ज्या मुलाने मला पहिल्यांदा ब्लॅकमेल केलं त्याने माझे व्हीडिओ त्याच्या आणखी काही मित्रांना पाठवले त्यांनी त्यांच्या आणखी मित्रांना पाठवले. त्यामुळे आरोपींची संख्या वाढत गेली.'

'पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हा मी सगळ्यांचे नंबर डिलिट केले होते. मी या सगळ्यांना भेटायला नकार दिला. मात्र मला पुन्हा ब्लॅकमेल करण्यात आलं आणि त्यानंतर माझ्यावरचे हे अत्याचारांचं सत्र सुरू आलं. मला थम्सअप सारखं कोल्ड ड्रिंक देण्यात आलं त्यात पावडर टाकण्यात आली होती. त्यानंतर बेशुद्ध करून माझ्यावर बलात्कार करण्यात आला.'

'तुझ्या घरच्यांना व्हीडिओ दाखवू, तुझे व्हीडिओ व्हायरल करू अशी धमकी देऊन माझ्यावर बलात्कार करण्यात आला.'

'अश्लील व्हीडिओ दाखवून हुक्का ओढण्यासही भाग पाडलं जात असं. फेब्रुवारी, मार्च, मे या महिन्यांमध्ये हे प्रकार घडले आहेत. नवी मुंबईतली काही घरं, डोंबिवलीतल्या काही निर्जन ठिकाणी, पडक्या चाळींमध्ये मला नेण्यात आलं होतं.' असंही या मुलीने जबाबात म्हटलं आहे.

'6 मे रोजी जेव्हा तिला नेण्यात आलं तेव्हा माझ्या आईने पोलिसात तक्रार केली होती की माझी मुलगी हरवली आहे. तेव्हा मला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.' असंही या मुलीने सांगितलं.

'मला आरोपी फोन करून वारंवार भेटण्यास सांगत होते. मी नकार दिला की व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. 16 मे रोजी जेव्हा त्यांना भेटायला येणार नकार दिला तेव्हा Friends नावाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर काही व्हीडिओ पोस्ट करण्यात आले' असंही या मुलीने जबाबात म्हटलं आहे.

Dombivli Minor Gang Rape
धक्कादायक, डोंबिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 जणांकडून बलात्कार

'हे घडल्याने मला पुन्हा एकदा या मुलांना भेटायला जावं लागलं. मला त्रास होऊ लागला तेव्हा मी आईला सांगितलं.' पीडितेने आईला हे सगळं सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

Related Stories

No stories found.