'माझ्या मृत्यू पश्चात पत्नीचे कुंकू पुसू नका', पतीचे प्रतिज्ञापत्र सादर

'माझ्या मृत्यू पश्चात पत्नीचे कुंकू पुसू नका' अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्रच एका व्यक्तीने सादर केलं आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
dont wipe wifes kumkum after my death husband submitted affidavit in solapur
dont wipe wifes kumkum after my death husband submitted affidavit in solapur

विजयकुमार बाबर, सोलापूर: अनिष्ट प्रथांमुळे विधवांना उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. ती वेळ आपल्या पत्नीवर येऊ नये म्हणून करमाळा तालुक्यातील पोथरे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी पारंपारिक अनिष्ट रूढींच्या सर्व बंधनातून पत्नीला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तहसीलदारांना शंभर रुपयांच्या बाँडवर आपल्या मृत्यू पश्चात पत्नीवर अनिष्ट रूढी परंपरा लादू नये असे प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.

नवरा मरण पावल्यानंतर विधवा महिलेचे कुंकू पुसले जाते. बांगड्या फोडल्या जातात काही ठिकाणी अलंकार काढून घेतले जातात. सणावाराला विधवा महिलेला समाजात कोणत्याही कार्यक्रमात मान दिला जात नाही. अशा अनेक अनिष्ट रूढी परंपरा प्रथा आजही आपल्या समाजात आहेत.

जग बदलत असले तरी महिलांवर होणारे अन्याय,अत्याचार कमी झालेले नाहीत. त्यामुळे अशा प्रथांना थारा न देता आपण हा निर्णय घेतल्याचे प्रमोद झिंजाडे यांनी जाहीर केले.

64 वर्षीय प्रमोद झिंजाडे यांनी लग्नाच्या 44 वर्षानंतर आपल्या सुखी संसारातून भावी काळात आपल्या नंतर पत्नीला समाजाकडून रुढी-परंपरांचा होणारा त्रास टाळण्यासाठी पत्नी अलका हिला जुन्या रूढी व परंपरा येथून पूर्ण मुक्त केले आहेत. त्यांना दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. सर्व मुले उच्चशिक्षित असून सर्वांचे लग्न झाली असून ती नोकरीसाठी बाहेरगावी असतात.

प्रमोद झिंजाडे यांचं प्रतिज्ञापत्र
प्रमोद झिंजाडे यांचं प्रतिज्ञापत्र

दरम्यान, झिंजाडे यांच्या निर्णयानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. तसेच समाजातील इतर व्यक्तींना देखील अशाच प्रकारचा पुढाकार घ्यायला हवा. असेही अनेकांनी म्हटले आहे. असा उपक्रम भविष्यात विधवा महिलांना सन्मान मिळवून देईल असेही यावेळी प्रमोद झिंजाडे यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in