Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..

जाणून घ्या मनिष भानुशाली यांनी काय उत्तर दिलं आहे?
Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..

NCB ने क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी केलेली कारवाई बनावट आहे असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर त्यांनी अरबाझ मर्चंटला जो सोबत घेऊन गेला तो भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत. मनिष भानुशाली आणि NCB यांचा काय संबंध आहे हे देखील स्पष्ट करावं लागेल असंही नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना मनिष भानुशाली यांनी उत्तर दिलं आहे.

मनिष भानुशाली यांच्यााशी मुंबई तकने संवाद साधला त्यावेळी मनिष भानुशाली म्हणाले की, 'मला थोडी माहिती मिळाली होती. ती माहिती ड्रग्ज पार्टीबद्दल होती. ड्रग्जचा विळखा तरूण पिढीला कमकुवत बनवतो आहे. हे कोण लोकं आहे त्यांना पकडलं पाहिजे या उद्देशाने मी NCB ला यासंदर्भातली माहिती दिली. या लोकांना पकडलं पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे म्हणून मी ही माहिती NCB ला दिली. त्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर कारवाई केली.'

तुम्ही तिथे रेड करताना गेला होतात का? असं विचारलं असता भानुशाली म्हणाले की, 'आम्ही त्यांना पकडलं नाही. सगळी कारवाई NCB ने केली. मी सोबत चाललो होतो, आम्हाला जी माहिती मिळाली होती ती साक्षही नोंदवायची होती म्हणून आम्ही गेलो होतो. देशहिताचं जे काम आहे ते आम्ही केलं. नवाब मलिक जे आरोप करत आहेत त्यात तथ्य नाही. भाजपमध्ये माझ्याकडे कुठलंही पद नाही. के. पी. गोसावी कोण आहेत तेदेखील मला माहित नाही' असंही भानुशाली यांनी म्हटलं आहे.

Drugs Case : नवाब मलिक यांच्या आरोपांना भाजपच्या मनिष भानुशालींनी दिलं उत्तर, म्हणाले..
सुझान खान म्हणते, आर्यन चांगला मुलगा, फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी सापडला!

'तो' तर भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली आहे'

मनिष भानुशाली याचे फोटो मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, गुजरातच्या अनेक मंत्र्यांसोबत आहेत, केंद्रीय मंत्र्यांसोबत आहेत. त्यामुळे आता NCB ला सांगावं लागेल की, मनिष भानुशाली याचे NCB शी काय संबंध आहेत. असा सवाल नवा मलिक यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in