Drugs Case : 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? कोर्टात वकिलांनी सांगितला सगळा घटनाक्रम

जाणून घ्या वकील मानेशिंदे यांनी काय सांगितलं कोर्टात
Drugs Case : 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? कोर्टात वकिलांनी सांगितला सगळा घटनाक्रम

सध्या महाराष्ट्रात एक विषय चांगलाच चर्चेत आहे आणि तो म्हणजे क्रूझ ड्रग पार्टी. या पार्टीत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक झाली आहे. मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट ही बडी नावंही त्यात आहेत. सोमवारी जेव्हा आर्यनला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा त्याला 7 ऑक्टोबर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली होती. आज आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज त्या रात्री नेमकं काय घडलं? NCB च्या अधिकाऱ्यांनी आर्यनला काय विचारलं हे सगळं कोर्टात सांगण्यात आलं.

आर्यन खान
आर्यन खान फोटो-इंस्टाग्राम

जाणून घेऊ कोर्टात नेमकं काय घडलं?

किला कोर्टामध्ये आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आर्यनची बाजू मांडली. यावेळी आर्यनसोबत घडलेला सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितलं. आर्यनने जी सांगितलं ती बाजू मानेशिंदे यांनी कोर्टात मांडली. 'मी क्रूझ टर्मिनलवर पोहचलो, तेव्हा तिथे अरबाझही तिथे होता. मी अरबाझला ओळखत होतो, त्यामुळे आम्ही दोघेही शिपच्या दिशेने निघालो. मी तिथे पोहचताच त्या लोकांनी मला सोबत ड्रग्ज बाळगलं आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर मी नाही उत्तर दिलं. त्यांनी माझी बॅग तपासली. त्यांना काहीही मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी माझा मोबाईल घेतला. त्यानंतर मला ते एनसीबी कार्यालयात घेऊन गेले. रात्री दीड-दोन वाजेपर्यंत वकिलांना भेटण्याची संमती दिली. एनसीबीने माझ्या फोनने सगळं डाऊनलोड केलं आणि त्यानंतर त्याचवरून माझी चौकशी सुरू करण्यात आली. माझी त्या रात्रीबाबत काहीही तक्रार नाही' अशा शब्दात आर्यनने भूमिका मांडली असं मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं.

Drugs Case : 'त्या' रात्री नेमकं काय घडलं? कोर्टात वकिलांनी सांगितला सगळा घटनाक्रम
आर्यन खान करत होता 'या' अलिशान क्रूझमध्ये पार्टी

आर्यन पार्टीत कसा आला?

'माझा प्रतीक नावाचा एक मित्र आहे त्याने मला फोनवर सांगितलं होतं की क्रूझ पार्टीसाठी VVIP रूपात निमंत्रण येईल. प्रतीक गाबा हा फर्निचरवालासोबत संपर्कात होता. फर्निचरवाला ही ती व्यक्ती आहे जी पार्टी आयोजकांच्या संपर्कात होती. पार्टीत ग्लॅमरचा तडका असावा म्हणून मला पार्टीत निमंत्रण देण्यात आलं असेल' असं आर्यनने सांगितल्याचं मानेशिंदे यांनी सांगितलं.

आर्यन आणखी काय म्हणाला?

'अरबाझ माझा मित्र नाही हे मला मुळीच म्हणायचं नाही. पण तो काय करतो आहे त्याची मला खरंच कल्पना नव्हती. प्रतीकही अरबाजचा मित्र आहे. मात्र माझा एकाही आरोपीसोबत संपर्क नाही.' अशीही भूमिका आर्यनने मांडली असल्याचं मानेशिंदे यांनी सांगितलं.

'अचित हा एकमेव व्यक्ती आहे ज्याचं कन्फ्रंटेशन व्हायला हवं. माझे सगळे चॅट कस्टडीतले आहेत. मी त्यांच्यासोबत छेडछाड करु शकत नाही. फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे सर्व गोष्टी पाठवल्या गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून एनसीबीने आर्यनची चौकशी केलेली नाही. कदाचित ते इतर आरोपींची चौकशी करण्यात व्यस्त असतील. पण आर्यनची खरंच दरदिवशी कस्टडीत राहण्याची गरज आहे? कारण तुम्ही एखाद्याला अटक केली म्हणजे तो खरंच आरोपी झाला, असा होत नाही. जर तो आरोपी असता तर त्याने आतापर्यंत कदाचित सर्व गुन्हा कबूल केला असता. त्याच्याकडून काहrतरी मिळालं असतं. 100 ऑफिसर आहेत फक्त कन्फ्रंटेशनसाठी कुणाला रिमांडवर घेतलं जाऊ शकत नाही. गेल्या सात दिवासांत यांना काहीच मिळालं नाही. याचा अर्थ काही आहेच नाही. चौकशी होत तर नाही आहे. मग कस्टडीची काय गरज?', असा प्रश्न वकील सतीश माने-शिंदे यांनी उपस्थित केला.

mumbai cruise drugs party case shah rukh khan son aryan khan bail hearing ncb raid
mumbai cruise drugs party case shah rukh khan son aryan khan bail hearing ncb raid(फाइल फोटो)

क्रूझवर जाण्याआधी काय घडलं?आर्यनने काय सांगितलं ते मानेशिंदे यांनी स्पष्ट केलं-

मी क्रूझ टर्मिनलवर पोहोचलो जिथे अरबाज सुद्धा होता ...

मी त्याला ओळखत असल्याने, जेव्हा आम्हाला अडवले गेले तेव्हा आम्ही एकत्र जहाजाच्या दिशेने चाललो

मी तिथे गेल्यावर ... त्यांनी विचारले की मी ड्रग्ज घेऊन जात आहे का ... मी नाही म्हटले

त्यांनी माझी बॅग शोधली ... नंतर माझ्या व्यक्तीचा शोध घेतला ... पण काहीही सापडले नाही

त्यानंतर त्यांनी फोन हातात घेतला आणि मला एनसीबी कार्यालयात नेण्यात आले

गेल्या सात दिवसात त्यांनी कुठलाही कट किंवा काहीही शोधलं नाही

पहिल्या दिवशी माझी काहीही चौकशी झाली नाही.

Related Stories

No stories found.