Drugs Case : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलची 10 तास कसून चौकशी

Drugs Case : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलची 10 तास कसून चौकशी

ड्रग्ज प्रकरणावरून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप करणाऱ्या एनसीबीच्या दिल्ली टीमने साक्षीदार क्रमांक एक प्रभाकर साईलची दहा तास कसून चौकशी केली. एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर साईलची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रभाकर साईलची आज पुन्हा चौकशी केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

सोमवारी दुपारी मुंबईतल्या वांद्रे भागात असलेल्या सीआरपीएफ कॅम्प कार्यालयात प्रभाकर साईल त्यांच्या वकिलांसह पोहचला होता. प्रभाकर साईल हा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार क्रमांक एक आहे. दुपारी 2 ते रात्री 12 अशी दहा तास त्याची चौकशी करण्यात आली. नेमके काय प्रश्न विचारण्यात आले त्याची प्रभाकरने काय उत्तरं दिली हे अद्याप ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलेलं नाही. सगळी चौकशी केल्यानंतर आम्ही मीडियाला यासंदर्भात माहिती देऊ असं सिंह यांनी सांगितलं आहे. आज प्रभाकर साईलला पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. एवढंच नाही तर सिंह यांना नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरही प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावरही त्यांनी काहीही भाष्य केलं नाही.

24 ऑक्टोबरला प्रभाकर साईलने सगळ्यात आधी मुंबई तकला मुलाखत दिली आणि गौप्यस्फोट केले. क्रूझ रेडचा जो पंचनामा झाला, त्यातला नंबर वनचा पंच विटनेस आहे प्रभाकर साईल. शिवाय किरण गोसावीचा बॉड़ीगार्ड म्हणूनही साईलने काम केलंय. याच प्रभाकर साईलने किरण गोसावी आर्यन खानचं कुणाशी तरी बोलणं करवून देत होता, हा व्हीडिओ समोर आणला. पुढे जाऊन पूजा ददलानी जी शाहरूख खानची मॅनेजर आहे, तिच्याशीच हे बोलणं करवून दिल्याचं किरण गोसावीने सांगितलं.

Drugs Case : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलची 10 तास कसून चौकशी
के.पी. गोसावींनी केलेल्या सगळ्या आरोपांचे माझ्याकडे पुरावे-प्रभाकर साईल

प्रभाकर साईलने सगळ्यात मोठा आरोप केला की, किरण गोसावी आणि सॅम डिसूझा 3 ऑक्टोबरला रात्री भेटले, आणि त्यात डीलबाबत चर्चा झाली, जी पूजा ददलानींना सांगण्यात आली. 25 कोटींची डील जी 18 कोटींमध्ये मध्ये सेटल झाली आणि त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना द्यायचे आणि उरलेले आपल्यात वाटायचे अशी डील झाल्याचा आरोप प्रभाकर साईलने केला. या आरोपांनी त्याने खळबळ उडवून दिली. तसंच समीर वानखेडेंपासून आपल्या जीवाला धोका असल्याचंही त्याने म्हटलं होतं.

24 ऑक्टोबरच्या आधी नवाब मलिक हेच आरोप करत होते. मात्र प्रभाकर साईल समोर आल्याने या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला. मग इतरही नावं समोर आली. गेल्या काही दिवसांमध्ये नेमकं काय घडलं? के.पी. गोसावी, मनिष भानुशाली, मोहित कंबोज अशी अनेक नावं या प्रकरणात समोर आली आहेत. आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी तर रोज झडत आहेत. अशात आता प्रभाकर साईलच्या चौकशीतून नेमकं काय बाहेर येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in