दारू पिऊन भरधाव निघाला अन् दिडींतील 25 वारकऱ्यांना चिरडलं; चौघांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कार्तिकी एकादशनिमित्त खोपोलीहून पालखी घेऊन तीर्थक्षेत्र आळंदीकडे हरिनामाचा जप करत पायी निघालेल्या चार वारकऱ्यांना मद्यधुंद चालकामुळे जीव गमवावा लागला. आळंदीच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताच दिंडीतल्या पंचवीस वारकऱ्यांना एका पिकअप जीप उडवलं. या भीषण अपघातामध्ये 7 वारकरी मृत्यूशी झुंज देत असून, 4 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. वडगाव मावळ लगत असलेल्या सातेगावजवळ शनिवारी सकाळी 7.00 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेऊन 110 वारकरी हे आळंदीकडे पायी निघाले होते. दिंडी रस्त्याच्या कडेनं जात असताना मागून भरधाव वेगात आलेल्या महिंद्रा पिकअप जीपने या दिंडीतील वारकऱ्यांना चाकाखाली चिरडलं. शनिवारी सकाळी झालेल्या या दुर्दैवी अपघातात काही वारकरी रस्त्याच्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. तर त्यांनी सोबत घेतलेले खाद्यपदार्थ, मोबाईल फोन हे सुद्धा अस्ताव्यस्त पडलं होतं.

हा अपघात इतका भीषण होता की अन्य वारकऱ्यांना क्षणभर काय करावं हेच सुचलं नाही. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. दिंडीतील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भरती केलं. या अपघातामध्ये 25 वारकरी जखमी झाले असल्याची माहिती असून, याच परिसरातील चार वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 4 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 7 वारकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, ज्या पिकअप जीपने वारकऱ्यांना उडवलं. त्या जीपच्या चालकाला वडगाव पोलिसांनी अटक केली. चालकाला अटक केल्यानंतर अपघाताचं कारण समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीकअपचा गाडी चालवत असताना मद्यधुंद अवस्थेत होता. तो दारूच्या नशेत ही गाडी बेदरकारपणे चालवत असल्यानेच अपघात झालाचा प्राथमिक अंदाज आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT