Crime: नाइट कर्फ्यूदरम्यान जेवण न दिल्याने हॉटेल मालकाची गोळी झाडून हत्या

Crime News: नाइट कर्फ्यू दरम्यान जेवण देण्यास नकार दिल्याने दोन जणांनी हॉटेल मालकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Crime: नाइट कर्फ्यूदरम्यान जेवण न दिल्याने हॉटेल मालकाची गोळी झाडून हत्या
during night curfew when shop owner refused to give food two people shot and killed him(प्रातिनिधिक फोटो)

नोएडा: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच नोएडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे नाईट कर्फ्यू (Night Curfew)दरम्यान, जेव्हा ऑनलाइन दुकान मालकाने जेवण देण्यास नकार दिला तेव्हा त्याची थेट गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खबळबजनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. सध्या तरी या घटनेतील मारेकरी हे फरार झाले आहेत.

ग्रेटर नोएडातील बीटा-2 भागातील ओमॅक्स आर्केडिया मॉलमधील ऑनलाइन फूड जॉइंटमध्ये गोळीबाराची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. जिथे ऑनलाइन फूड जॉइंटचा मालक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जखमी दुकान मालकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले होते. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

या प्रकरणाच्या तपासात असे समोर आले की, 1 जानेवारी रोजी रात्री दीड वाजेच्या दरम्यान या ऑनलाइन फूड जॉइंटवर दोन जण आले. जे मागील ३ वर्षांपासून येथील नियमित ग्राहक आहेत. पण दुकान बंद होण्याची वेळ आलेली असल्याने दुकान मालकाने त्यांना जेवण देण्यास नकार दिला.

दोन तासांनी आरोपी परत आले अन् दुकान मालकावर गोळ्या झाडल्या

जेवण न मिळाल्याने दोघेही जण प्रचंड संतापले. सुरुवातीला त्यांचं दुकान मालकाशी जागेवरच भांडण होऊन जोरदार वादावादी झाली होती. पण नंतर प्रकरण शांत झाले आणि दोन्ही ग्राहक परत गेले. मात्र त्यानंतर अचानक दोघेही 2 तासानंतर पुन्हा दुकानात आले. त्यांनी दुकानाचा दरवाजा उघडून थेट दुकान मालकावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला.

during night curfew when shop owner refused to give food two people shot and killed him
Palghar Firing: चिकन सेंटरच्या मालकावर भर वस्तीत गोळीबार, CCTV मध्ये संपूर्ण थरार कैद

यादरम्यान, दुकान मालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी सध्या फरार आहेत. नोएडाच्या गौतम बुद्ध नगरमध्ये रात्री 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू आहे. अशावेळी गोळीबारीची घटना घडल्याने या परिसरात घबराटीचं वातावरण पसरलं आहे.

सध्या आरोपींना पकडण्यासाठी नोएडा पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार करुन वेगवेगळ्या भागात पाठवली आहेत. सध्या पोलीस या दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत आहेत. मात्र, दोघांपैकी एकही जण पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही. आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांवर देखील सध्या मोठा दबाव आहे. पोलीस देखील नजीकचे सीसीटीव्ही तपासून सध्या आरोपींची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे लवकरच दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in