Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 43 हजार 211 नवे रूग्ण, ओमिक्रॉनचे 238 रूग्ण

महाराष्ट्रात दिवसभरात 19 मृत्यूंची नोंद
कोरोना चाचणी
कोरोना चाचणी (फोटो सौजन्य - India Today)

महाराष्ट्रात दिवसभरात 43 हजार 211 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 19 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 1.98 टक्के झाला आहे. दिवसभरात 33 हजार 356 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 67 लाख 17 हजार 125 कोरोना बाधित रूग्ण घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाणे 94.28 टक्के इतके झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 15 लाख 64 हजार 70 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 71 लाख 24 हजार 278 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 9286 व्यक्ती क्वारंटाईन आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - PTI)

ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 238 नवे रूग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 238 नवे रूग्ण आढळले आहेत. हे रूग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थान यांनी दिले आहेत. या 238 रूग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

कुठे आहेत 238 रूग्ण?

पुणे मनपा-197

पिंपरी-32

पुणे ग्रामीण आणि नवी मुंबई-प्रत्येकी 3

मुंबई -2

अकोला-1

आजपर्यंत राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 1605 रूग्ण झाले आहेत.

1605 रूग्ण कुठे आहेत?

मुंबई-629

पुणे मनपा-526

पिंपरी-107

सांगली-59

नागपूर-51

ठाणे-48

पुणे ग्रामीण-44

कोल्हापूर आणि पनवेल-प्रत्येकी 18

सातारा आणि नवी मुंबई-प्रत्येकी 13

उस्मानाबाद-11

अमरावती-9

कल्याण डोंबिवली-7

बुलढाणा, वसई आणि अकोला-प्रत्येकी 6

भिवंडी-5

नांदेड, उल्हासनगर, औरंगाबाद, मीरा भाईंदर आणि गोंदिया-प्रत्येकी 3

अहमदनगर, गडचिरोली, लातूर, नंदुरबार, नाशिक आणि सोलापूर-प्रत्येकी 2

जालना आणि रायगड- प्रत्येकी 1

एकूण-1605

कोरोना चाचणी
Omicron : ओमिक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका, WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

यापैकी 859 रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 4641 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 83 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

राज्यात आज घडीला 2 लाख 61 हजार 658 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 43 हजार 211 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संक्या 71 लाख 24 हजार 278 इतकी झाली आहे.

कोरोना चाचणी
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

मुंबईत दिवसभरात 11 हजार 317 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 9 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. तर चांगली बातमी ही आहे की मुंबईत दिवसभरात जेवढे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले त्यापेक्षा दुप्पट रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मुंबईत 22 हजार 73 रूग्णांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं आहे.

आज दिवसभरात मुंबईत 11 हजार 317 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 800 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 88 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात मुंबईत 59 हजार 924 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 11 हजार 317 पॉझिटिव्ह आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in