भावना गवळींचे सहकारी सईद खान आहेत तरी कोण? जाणून घ्या...ईडी कारवाईनंतर चर्चेला उधाण

सईद खान हे भावना गवळींचे जवळचे सहकारी मानले जातात
भावना गवळींचे सहकारी सईद खान आहेत तरी कोण? जाणून घ्या...ईडी कारवाईनंतर चर्चेला उधाण

१०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप असलेल्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना ईडीने आज अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने भावना गवळी यांज्या वाशिम आणि यवतमाळ येथील विविध मालमत्तांवर धाडी टाकल्या होत्या.

भावना गवळी यांच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेक व्यवहरांमध्ये सईद खान यांची महत्वाची भूमिका असायची. भावना गवळी यांच्या आईसह सईद खान हे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. ट्रस्टचे रुपांतर फर्ममध्ये करत असताना धर्मादाय आयुक्तालयात फसवणूक केली गेली असल्याचा ईडीला संशय आहे. त्याचबरोबर फर्मचा वापर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी केल्याचाही संशय आहे.

आजच्या अटकेच्या कारवाईनंतर सईद खान यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. जाणून घेऊयात कोण आहेत सईद खान?

सईद खान हे मुळचे परभणीच्या पाथरी शहरातले रहिवासी. येथील आठवडी बाजार परिसरात त्यांचं घर आहे. सईद खान यांचा पहिले चहा-पाण्याचं हॉटेल, ट्रान्सपोर्ट असा व्यवसाय होता. कल्पना ट्रान्सपोर्ट आणि कल्पना हॉटेल या नावाने त्यांनी सुरुवातीला व्यवसाय केला. सईद खान यांची दोन लग्न झाली असून त्यांची पहिली सासुरवाड जिंतूर तर दुसरी सासुरवाड परभणी शहरातील मुमताज कॉलनी मधली आहे.

सईद खान यांची दोन लग्न झाली असून त्यांची पहिली सासुरवाड जिंतूर तर दुसरी सासुरवाड परभणी शहरातील मुमताज कॉलनी मधली आहे. पहिल्या लग्नापासून सईद खान यांना एक मुलगा तर दुसऱ्या लग्नातून दोन मुली आहेत. भावना गवळी यांच्या व्यवसायाशी असलेल्या संबंधाव्यतिरीक्त रईस खान यांची राजकीय पार्श्वभूमीही आहे. विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे ते कट्टर विरोधक मानले जातात.

सर्वसाधारण कुटुंबातून वर आलेल्या रईस खान यांनी काही काळातच आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी झेप घेतली. सार्वजनिक बांधकाम आणि सिंचन क्षेत्रात ते काही काळ ठेकेदार म्हणूनही काम करत होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना हा पार्टिकल बोर्ड चे पार्ट तयार करण्यासाठी निर्मिण्यात आला. हा कारखाना वाशिमच्या शिरोडमध्ये आहे.

हा कारखाना 1992 मध्ये पुंडलिक रामजी गवळी यांनी सुरू केला. पुंडलिक गवळी हे भावना गवळी यांचे वडील आहेत. भावना गवळी या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. या फॅक्टरीला नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थातत NCDC ने भांडवल दिलं. तसंच राज्य सरकारनेही मिळून यामध्ये 55 कोटींची गुंतवणूक आहे.

इतकं सगळं होऊनही आश्चर्याची बाब ही आहे की हा कारखाना कधी सुरूच झालाच नाही. या कारखान्यात कुठलंही उत्पादन न होता हा कारखाना तोट्यात गेला असं दाखवण्यात आलं आहे.

या कारखान्यासाठी जे साहित्य मागवण्यात आलं त्याचे दर डोळे विस्फारणारे आहेत. खासरून बाहेरून आयात करण्यात आलेल्या मशीनच्या किंमती या कोड्यात टाकणाऱ्या आहेत.

या कारखान्यावर झालेला सगळ्यात आलेला आरोप हा आहे की या कंपनीचं बाजारमूल्य हे 55 कोटी असताना या कारखान्याचं अवमूल्यांकन करण्यात आलं आहे. 7 कोटी 9 लाख 90 हजार इतकं कमी मूल्य या कारखान्याचं दाखवण्यात आलं. हे अवमूल्यांकन पुण्यातील MITCON कंपनीने केलं आहे.

Related Stories

No stories found.