मुंबई दंगलीवेळी चर्चेत ते ED कडून अटक, संजय पांडेंबद्दल ‘या’ 5 गोष्टी माहितीये?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीनं अटक केलीय. एनएसई को लोकेशन घोटाळ्यात बेकायदेशीररित्या फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सीईओ चित्रा रामकृष्णन यांच्या सांगण्यावरून त्यांनी फोन टॅपिंग केल्याचा ईडीचा आरोप आहे. याचप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. पण, हे संजय पांडे कोण आहेत? त्यांची निवृत्त होईपर्यंतची पोलिस दलातील कारकीर्द कशी होती? हेच जाणून घेऊयात.

मुंबई दंगलीवेळी पहिल्यांदा संजय पांडे कसे आले चर्चेत?

आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतलेले संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर मुंबईत डीसीपी रँकचे अधिकारी बनले. संजय पांडे सर्वाधिक चर्चेत आले ते १९९२ च्या मुंबई दंगलीवेळी. त्यांनी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीत शांतता प्रस्थापित करण्याचं काम केलं होतं. दंगलखोरांना नडणारे आयपीएस अधिकारी असंही त्यांना त्यावेळी म्हटलं गेलं. त्यांनी दंगलीत सहभागी असलेल्या दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. यावेळी पांडेंवर कौतुकाचा वर्षावही झाला होता. इतकंच नाहीतर परवानगी नसताना पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन केल्यानं गोपीनाथ मुंडेंनाही त्यांनी अटक केली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना
फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने केली अटक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

2) कॉबलर घोटाळ्याचा तपास –

पांडेंच्या कारकिर्दीतील महत्वाची घडामोड म्हणजे कॉबलर घोटाळ्याचा तपास. १९९८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे डीसीपी असताना त्यांनी काही शू फर्मविरोधात गुन्हे दाखल केले होते. हा मोठा घोटाळा होता. या घोटाळ्यामुळे पांडे अडचणीत सापडले होते, असंही अनेकांना वाटतं. कारण या घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच त्यांची जालन्याला बदली करण्यात आली. त्यानंतर १९९९ मध्ये ते केंद्रात गेले आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात झाले.

ADVERTISEMENT

3) एक कंपनी स्थापन केली अन्…

ADVERTISEMENT

पांडे पूर्णवेळ नोकरीत होते का? तर याचं उत्तर नाही असं देता येईल. कारण, त्यांनी २००१ मध्ये पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता. पण, यावेळी त्यांचा राजीनामा स्विकारला नाही. त्यांना सेवेत पुन्हा रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या. याच काळात त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली होती. सेवेते रुजू झाल्यानंतर ही कंपनी दुसऱ्याकडं सोपवली. याच कंपनीला २०१० ते २०१५ या काळात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षणाचे कंत्राटही दिले होते. या प्रकरणात आता संजय पांडे अडचणीत सापडले आहेत. त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

4) उद्धव ठाकरेंना पत्र –

संजय पांडे आणि राज्य सरकारमध्ये वादही झाला. पांडेंनी २०११ मध्ये राज्य सरकारविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मला सक्तीच्या रजेवर ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी कोर्टात केला होता. त्यानंतर संजय पांडेंना पोलिस सेवेत पुन्हा पद मिळालं होतं. २०१५ मध्ये त्यांना होमगार्डचे डीजीपी म्हणून पोस्टींग दिली. पण, २०२१ मध्ये अँटीलिया स्फोटके प्रकरणानंतर मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची तडकाफडकी बदली केली. यावेळी संजय पांडेंची बदली महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनला केली होती. त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार देण्यात आला होता. गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची मुंबईचे पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली. सध्या संजय पांडे निवृत्त झाले आहेत.

5) लोकल ट्रेनने प्रवास –

संजय पांडेंनी पोलिस दलात महत्वाच्या भूमिका बजावल्या. पण, त्यांच्याबद्दलची एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते इतक्या मोठ्या पदावर असताना देखील लोकल ट्रेननं प्रवास करायचे. वरिष्ठ संपादक अनिल कुमार सिंग यांनी याबाबतची एक पोस्ट आणि फोटो फेसबुकवर शेअर केला होता. त्यामधून ही बाब समोर आली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT