माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ईडी कडून गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोरील अडचणी काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ज्यानंतर CBI ने त्यांच्याविरुद्ध चौकशीला सुरुवात केली. आता ईडी (Enforcement Directorate) ने अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे.

Prevention of Money Laundering Act (PMLA) अंतर्गत ईडीने अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला असून यानंतर अनिल देशमुखांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर रहावं लागण्याचे संकेत मिळत आहेत. सीबीआयने देशमुखांविरोधात दाखल केलेल्या FIR चा अभ्यास केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या नागपूर येखील घरावर सीबीआयने छापे मारले होते.

मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यापासून अनिल देशमुख चर्चेत होते. राज्य सरकारने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांनी सचिन वाझेंकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण न्यायालयात पोहचल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये देशमुख आपल्यावरील आरोपांना कसं उत्तर देतात हे पहावं लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT