Exclusive : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी

Exclusive : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी

मनी लॉड्रींग अर्थात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आता शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येतेआहे. मुंबई तकच्या हाती यासंदर्भातली एक्सक्लुझिव्ह माहिती आली आहे. या प्रकरणामुळे आता रविंद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.

शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची ईडीने आठ तास चौकशी केली. आज दुपारच्या सुमारास रविंद्र वायकर हे ईडी कार्यालयात आले होते. त्यानंतर सुमारे आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी करण्यात आली असली तरीही नेमकं प्रकरण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

रविंद्र वायकर हे माजी मंत्री होते. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. रविंद्र वायकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्याच्या ईडी चौकशीचं नेमकं कारण काय होतं, यावरुन तर्कवितर्कांना उधाण आलंय. मात्र या चौकशीबाबात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असून कोणत्या प्रकरणी रविंद्र वायकर हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते, हे समजू शकलेलं नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in