ED चा फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यांतही गैरवापर, विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न-शरद पवार

जाणून घ्या ईडीबाबत आणि शेतकरी आंदोलनाबाबत काय म्हणाले शरद पवार
शरद पवार
शरद पवार

ईडीकडून सध्या महाराष्ट्रात धाडी टाकणं सुरू आहे. काही बड्या नेत्यांशी संबंधित या धाडी आहेत. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही ईडीचा गैरवापर केला जातो आहे. विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जातो आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं सिमीत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत काय म्हणाले शरद पवार?

दिल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यांची दखल केंद्र सरकारने घेतली नाही. त्यांची दखल घ्यायला हवी होती पण तरीही दखल घेतली गेली नाही हे दुर्दैवी आहे असं शरद पवार म्हणाले. 14 महिने शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. थंडी, ऊन, पाऊस याचा विचार न करता शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र या सगळ्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं गेलं आहे.

'दिल्लीत गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. त्यांची दखल केंद्र सरकारने घेतली नाही हे दुर्दैवी आहे'
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे, याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले, 'केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे.असे निर्देश आहेत. मुख्यमंत्री ती काळजी घेत आहेत.अन्य घटकांचे काही दुसरे मत असेल, तर लोकशाही आहे. केंद्र सरकारच्या विचारांची लोक आहेत त्यानी तारतम्य ठेवण्याची गरज आहे' असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

राजू शेट्टींबाबत काय म्हणाले शरद पवार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं नाव विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीतून कापल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत शरद पवारांना विचारलं असता या चर्चेत काही तथ्य नाही असं शरद पवर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जी यादी राज्यपाल महोदयांना दिली आहे त्यामध्ये राजू शेट्टी यांचं नाव आहे. अंतिम भूमिका राज्यपाल घेणार आहेत. मात्र मला आश्चर्य वाटतं ते अशी विधानं केली जातात त्याबाबत. राजू शेट्टींना काय बोलायचं असेल तर मी त्यावर मी भाष्य करणार नाही. आम्ही दिलेला शब्द पाळला आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in