अभिनेत्री Jacqueline Fernandez ची ED कडून चौकशी

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?
अभिनेत्री Jacqueline Fernandez ची ED कडून चौकशी
जॅकलिन फर्नांडिसफोटो-इंडिया टुडे

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस एका मोठ्या प्रकरणात अडकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण दिल्लीच्या एका मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनची ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने चौकशी सुरू केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या पाच तासांपासून चौकशी सुरू झाली आहे.

(Money laundering case) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही चौकशी करण्यात येते आहे. जॅकलिनचा जबाब नोंदवण्यात येतो आहे. खंडणीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी हे प्रकरण निगडीत आहे असं समजतं आहे. तिहार जेलमधून 23 ऑगस्टला आत्तापर्यंत सर्वात मोठी खंडणी 200 कोटी वसूल करणाऱ्या आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि अॅक्ट्रेस लीना पॉलच्या चेन्नई येथील बंगल्यावर ईडीने छापा मारला होता. ईडीने ईस्ट कोस्ट रोडवर असलेल्या सुकेशच्या बंगल्यावर जो छापा मारला त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रूपये आहे. छापा मारल्यानंतर ईडीने मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि पंधरा आलिशान कार जप्त केल्या.

जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन फर्नांडिसफोटो-इंडिया टुडे

सुकेशने तिहार जेलमधून एका मोठ्या व्यावसायिकाच्या पत्नीकडून 200 कोटींची खंडणी वसूल केली. यामध्ये RBL बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समवेत तिहार प्रशासनाच्या काही लोकांना अटक करण्यात आली. सुकेशची निकटवर्तीय असलेल्या लीना पॉलचीही ईडीने चौकशी केली. सुकेशला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुकेश सध्या EOW च्या कोठडीत आहे. एवढंच नाही तर सुकेशला AIDMK चिन्हाच्या प्रकरणातही अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in