शिवसेना खासदार भावना गवळी ED च्या रडारवर! कार्यालयांसह विविध ठिकाणी धाडी

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात अनिल परब यांना ईडीकडून देण्यात आलेल्या नोटीसची चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेच्या आणखी एक महिला नेत्या ईडीच्या रडारवर आल्या आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या विविध मालमत्तांवर ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या असून, झाडाझडती घेतली जात आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. या नोटीसवरून राज्यातील राजकारण तापलेलं असतानाच आज अचानक ईडीने शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या घरं, कार्यालये आणि विविध संस्थांवर धाडी टाकल्या आहेत.

भावना गवळी यवतमाळच्या खासदार असून, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडीकडे तक्रार करण्यात आलेली होती. त्यानंतर आज ईडीकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. प्राथमिक माहितीप्रमाणे भावना गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या वाशिम, यवतमाळ येथील संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात घरं, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भावना गवळी यांच्या कार्यालयांसह सात ते आठ ठिकाणी छापेमारी केली जात आहे. यात यवतमाळ येथील भावना गवळी यांचं कार्यालय, वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे असलेल्या उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना अॅग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्याचं समजतंय.

किरीट सोमय्यांची तक्रार काय?

ADVERTISEMENT

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर आरोप केलेले आहेत. खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केलेला होता.

ADVERTISEMENT

ईडीच्या कारवाईवर सोमय्या म्हणाले…

भावना गवळी यांनी माफियागिरी चालवली आहे. भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून 18 कोटी रुपये काढलेले आहेत. त्यात सात कोटीं चोरीला गेल्याची तक्रार दिलीये. केंद्र सरकारचे 44 कोटी 11 कोटी रुपये स्टेट बँकेचे आहेत. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना 55 कोटींत उभारण्यात आला आणि भावना अॅग्रो लिमिटेडने फक्त 25 लाखांत तो खरेदी केला. त्यामुळे भावना गवळींच्या संस्थांवर धाडी पडल्या आहेत. या कारवाईचं मी स्वागत करतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT