Anil Deshmukh Money Laundering Case: गृह उपसचिवांना EDचं समन्स, अनिल देशमुखांच्या अडचणीत भर

Anil Deshmukh Money Laundering case: अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आता थेट गृह खात्याच्या उपसचिवांनाच ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं आहे.
Anil Deshmukh Money Laundering Case: गृह उपसचिवांना EDचं समन्स, अनिल देशमुखांच्या अडचणीत भर
Anil Deshmukh Money Laundering case: ED summons Deputy home Secretary of Maharashtra Kailash Gaikwad(फाईल फोटो)

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्रातील गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांना देखील आता समन्स बजावले आहे. कैलास गायकवाड यांना आज (30 सप्टेंबर) चौकशीसाठी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेकदा समन्स बजावलं आहे. मात्र असं असलं तरीही अनिल देशमुख किंवा त्यांचे कुटुंबीय हे एकदाही ईडीसमोर हजर झालेले नाहीत. अशातच आता गृह खात्यातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला ईडीने चौकशीसाठी बोलावल्याने अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मार्च महिन्यात एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी त्यावेळी गृहमंत्री पदावर असलेल्या अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला महिन्याला शंभर कोटी रूपये वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं. असा उल्लेख होता.

एवढंच नाही तर पोलिसांच्या बदल्यांमध्येही ते ढवळाढवळ करत होते असाही आरोपही करण्यात आला होता. या पत्राने खळबळ उडाली होती. हे प्रकरण आधी सुप्रीम कोर्टात आणि मग बॉम्बे हायकोर्टात गेलं. बॉम्बे हायकोर्टाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता.

ही शंभर कोटींची वसुली बार आणि रेस्तराँच्या मालकांकडून वसूल करायची असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. असंही परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं होतं. या पत्रामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

अनिल देशमुख यांच्या पत्नीला समन्स

दरम्यान, आतापर्यंत अनिल देशमुख यांना ईडीने अनेकदा समन्स बजावलं आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांच्या पत्नीलाही ईडीने समन्स बजावलं होतं. Money Laundering प्रकरणी अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती यांची चौकशी करण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं होतं. पण त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नव्हत्या.

Anil Deshmukh Money Laundering case:  ED summons Deputy home Secretary of Maharashtra Kailash Gaikwad
अनिल देशमुख यांच्यासाठी कोट्यवधींची वसुली करत होता सचिन वाझे, ED चा दावा

तत्कालीन खासगी सचिव संजीव पालांडे यांचं निलंबन

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव आणि अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांचं काही दिवसांपूर्वीच निलंबन करण्यात आलं आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात त्यांची चौकशी सुरू आहे त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ED ने 26 जूनला अटक केल्यानंतर 6 जुलैपर्यंत ते ईडीच्या कोठडीत होते त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.

त्यांचा पोलीस कोठडीतला कालावधी 48 तासांपेक्षा जास्त असल्याने 26 जूनपासून त्यांना निलंबित मानण्यात आलं आहे. तसंच पुढील आदेश येईपर्यंत निलंबित राहतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.