Election Result : कुणी किती जागा जिंकल्या?; पाहा राज्यनिहाय आकडेवारी

Election Results 2022 latest Updates : उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल
Election Result : कुणी किती जागा जिंकल्या?; पाहा राज्यनिहाय आकडेवारी

Uttar Pradesh (UP), Uttarakhand (UK), Manipur, Goa, Punjab Election Results 2022: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आणि सकाळपर्यंत सुरू असलेल्या वेगवेगळ्या तर्कांना पूर्णविराम मिळाला. उत्तर प्रदेश, पंजाबमधील निकाल एक्झिट पोलनुसार आले, तर उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यातही भाजपलाच जनादेश मिळाला. उत्तर प्रदेशात समाजवादी सन्मानजनक जागा मिळवल्या, तर पंजाबमध्ये काँग्रेसचा धुळधाण उडाली.

गोवा पुन्हा भाजपकडे

गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी निवडणूक झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालाप्रमाणे गोव्यात आम आदमी पक्षाने दोन जागा जिंकल्या आहेत. भाजपने २० जागा जिंकल्या असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. तीन अपक्ष उमेदवार निवडून आले असून, काँग्रेस ११ जागांवर विजयी झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष दोन जागांवर विजयी झाला आहे. आरजीपी (Revolutionary goans party) एका जागेवर विजयी झाली आहे.

Election Result : कुणी किती जागा जिंकल्या?; पाहा राज्यनिहाय आकडेवारी
मोबाईल रिपेअरिंगचं दुकान, बसमधून प्रवास करत प्रचार, कोण आहेत चन्नींना हरवणारे लभ सिंग?

मणिपूर विधानसभा निकाल

मणिपूर विधानसभेच्या सर्व जागांवरील निकाल हाती आले आहेत. ६० पैकी ३२ जागांवर भाजप विजयी झाली आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा ओलांडला आहे. काँग्रेसला मात्र मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेसने ५ जागा जिंकल्या आहेत. संयुक्त जनता दलाने ६ जागा जिंकल्या आहेत. कुकी पीपल्स आघाडीने दोन जागा जिंकल्या आहेत. नागा पीपल्स फ्रंट ५ जागा जिंकल्या आहेत. नॅशनल पीपल्स पार्टीने ७ जागा जिंकल्या आहेत. ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Election Result : कुणी किती जागा जिंकल्या?; पाहा राज्यनिहाय आकडेवारी
गोव्याच्या 'राज ठाकरें'चा वाघ आता विधानसभेत, म्हणाले तो गरजणार...

पंजाबचा निकाल...

पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. पंजाबच्या मतदारांनी 'आप' स्पष्ट बहुमत दिलं. 'आप'ने ९२ जागा जिंकल्या आहेत. बसपाने १ जागा जिंकली आहे. भाजपल पंजाबमध्ये फार यश मिळालं नाही. भाजपने २ जागा जिंकल्या असून, शिरोमणी अकाली दलाला तीन जागांवरच विजय मिळवता आले आहेत. काँग्रेसला केवळ १८ जागांवरच विजय मिळवता आला.

Election Result : कुणी किती जागा जिंकल्या?; पाहा राज्यनिहाय आकडेवारी
शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा मतदारांची NOTA ला पसंती, गोव्यात आघाडीची खिचडी शिजलीच नाही

उत्तर प्रदेशात ९५ जागांवरचे निकाल जाहीर

उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांपैकी ३८५ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने आतापर्यंत २४९ जागा जिंकल्या असून, ६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप स्पष्ट बहुमत मिळवताना दिसत आहे. समाजवादी पक्षाने १०३ जागा जिंकल्या आहेत, तर ८ जागांवर आघाडीवर आहेत. बसपाने एकही जागा जिंकता आली नाही. अपना दलने १२ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने २ जागा जिंकल्या., जनसत्ता दल लोकतांत्रिक पक्षाने २ जागा जिंकल्या, तर निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल ५ जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रीय लोक दलाने ८ जागा जिंकल्या आहेत. सुहेलदेव भारतीय समाज पार्टी ४ जागांवर विजयी झाली असून, २ जागांवर आघाडीवर आहे.

Election Result : कुणी किती जागा जिंकल्या?; पाहा राज्यनिहाय आकडेवारी
UP Election result : भाजपचा उमेदवार ठरला अजित पवारांवर वरचढ, जाणून घ्या कसं?

उत्तराखंडमधील ६८ जागांचे निकाल जाहीर

उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांपैकी ६८ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात बसपाने १ जागा जिंकली आहे, तर १ जागेवर आघाडीवर आहे. भाजपने ४७ जागा जिंकल्या आहे. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसने १८ जागा जिंकल्या असून, एका जागेवर आघाडीवर आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in