Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन शेजारच्यासोबत भांडण, इलेक्ट्रिक इंजिनीअरने केला खून

घरच्या कचऱ्यावरुन सुरु झालेला वाद गेला विकोपाला, आरोपीला अटक
Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन शेजारच्यासोबत भांडण, इलेक्ट्रिक इंजिनीअरने केला खून

पुणे: घरावर बांधकामाचा कचरा पडत असल्यामुळे झालेल्या वादातून पुण्यात एका इंजिनीअरने शेजाऱ्याचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबवेवाडी भागात घडलेल्या या घटनेत ३९ वर्षीय शरद पुरी यांचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी भागात मयत शरद पुरी आणि आरोपी सचिन कपटकर हे शेजारी राहत होते. मयत शरद पुरी यांच्या घरात काम सुरु असल्यामुळे त्यांचा कचरा हा सचिन यांच्या घरावर पडायचा. यावरुन दोघांमध्ये आज सकाळी पावणे दहा वाजल्याच्या दरम्यान वाद झाला.

या वादातून आरोपी सचिन कपटकरने शरद याच्या छातीत चाकू खूपसला. ज्यामुळे शरद याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी सचिन कपटकरला अटक केली आहे.

Pune Crime : क्षुल्लक कारणावरुन शेजारच्यासोबत भांडण, इलेक्ट्रिक इंजिनीअरने केला खून
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा, गळा चिरून केली हत्या

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in