Elgar Parishad case: NIA च्या आरोपपत्रात 'PM मोदींच्या हत्येच्या कटा'बाबत उल्लेख नाही!

NIA submits 17 draft charges against accused in Elgar Parishad case: एल्गार परिषद केस प्रकरणी NIA ने दाखल केलेल्या आरोपपत्रात PM मोदींच्या हतेच्या कटाबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
Elgar Parishad case: NIA च्या आरोपपत्रात 'PM मोदींच्या हत्येच्या कटा'बाबत उल्लेख नाही!
Elgar Parishad case

पुणे: राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) एल्गार परिषद (Elgar Parishad) प्रकरणात अटक केलेल्या 15 जणांविरोधात प्रस्ताव देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासह 16 वेगवेगळ्या गुन्ह्यांचे आरोप लावण्यात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात एनआयएने म्हटले आहे की, आरोपींनी सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यासाठी अत्याधुनिक शस्त्रे मिळवण्याचा कट रचला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले होते की, आरोपींनी शस्त्रे मिळवण्याचा केलेला प्रयत्न हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाशी जोडला गेलेला आहे. मात्र, एनआयएने आपल्या आरोपपत्रात पंतप्रधानांचा उल्लेख केलेला नाही. परंतु एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपपत्रात कोणत्याही विशिष्ट आरोपाचा उल्लेख नाही, परंतु त्याच्याशी संबंधित पुरावे हा या खटल्याचा भाग असेल.

मात्र, पुणे पोलिसांनी (Pune Police) दावा केला आहे की, त्यांनी या आरोपांबाबत एक पत्र जप्त केले आहे. आरोपी रोना विल्सनने या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि एका रिपोर्टचा हवाला देत असं म्हटलं होतं की, हे पुरावे खोटे आहेत 2018 मध्ये म्हणजे त्यांच्या अटकेच्या दोन वर्षांपूर्वी मालवेअरद्वारे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात ते प्लांट करण्यात आले होते.

एनआयएने आरोप केला आहे की, 15 आरोपी हे बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे सदस्य आहेत. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन हे दलित, इतर समाजातील लोकांच्या भावना भडकवण्यासाठी तसेच भीमा-कोरेगावसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हिंसा, अस्थिरता निर्माण व्हावी या उद्देशाने करण्यात आले होते.

तपास यंत्रणेने आरोप केला आहे की, आरोपींनी 'एम-4 (अत्याधुनिक शस्त्रे) च्या वार्षिक पुरवठ्यासाठी 8 कोटी रुपये उभारण्याचा कट रचला होता. आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी, देशभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना आपल्यासोबत जोडलं होतं.

जरी आरोपींविरुद्ध 16 सामान्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी त्यांच्यावर इतर कलमांखाली वेगवेगळे आरोपही लावण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, शिक्षणतज्ज्ञ आनंद तेलतुंबडे यांच्यावर पुरावे नष्ट करण्याशी संबंधित कलमाखाली आरोप लावण्यात आले आहेत.

एनआयएने इतर ज्यांच्याविरुद्ध आरोप केले आहेत त्यात सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, पी. वरवरा राव, वर्नोनन गोन्साल्विस, अरुण फेरिरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, हानी बाबू, रमेश गायचोर, ज्योती जगताप आणि सुरेंद्र गोरखे यांचाही समावेश आहे.

तपास यंत्रणेने आपल्या मसुद्यामध्ये फादर स्टेन स्वामी यांचाही उल्लेख केला आहे. ज्यांचे गेल्याच महिन्यात निधन झाले होते. मात्र, त्याच्याविरोधातील खटला थांबवण्यात आला आहे. याशिवाय, या प्रकरणात इतर लोकांचाही उल्लेख आहे. ज्यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

देशाविरूद्ध युद्ध छेडण्याव्यतिरिक्त, आरोपांमध्ये राजद्रोह, विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे, गुन्हेगारी षड्यंत्र आणि बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याशी संबंधित कलमे देखील समाविष्ट आहेत.

Elgar Parishad case
"एल्गार परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न"

एनआयएच्या आरोपपत्राच्या आधारे, विशेष न्यायालय आता कोणत्या कलमांखाली आरोपींवर आरोप लावता येतील यावर निर्णय घेईल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in