Elon Musk buys Twitter : एलन मस्क ट्विटरचे नवे मालक; खरेदीसाठी मोजले ४४ बिलियन डॉलर

Elon Musk to acquire Twitter : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांची सर्वात मोठी खरेदी
Elon Musk buys Twitter : एलन मस्क ट्विटरचे नवे मालक; खरेदीसाठी मोजले ४४ बिलियन डॉलर
एलन मस्क ट्विटरचे नवे मालक/elon musk buys twitter(Image: Reuters)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क (Elon Musk)हे आता जगभरातील लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया असलेल्या ट्विटरचे (Twitter) नवे मालक बनणार आहेत. तब्बल यांनी तब्बल ४४ बिलियन डॉलरमध्ये एलन मस्क (Elon Musk)यांनी Twitter Inc कंपनी खरेदी केली आहे. एलन मस्क यांनी ट्विटरला तसा खरेदी प्रस्ताव दिला होता, जो ट्विटरच्या (Twitter) बोर्डाने स्वीकारला आहे.

काही दिवसांपूर्वी एलन मस्क यांनी ट्विटरची ९ टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. समभाग खरेदी केल्यानंतर "ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मी याला मुक्त करण्यासाठी कंपनी आणि यूजर्सच्या कम्युनिटीसोबत काम करण्यास उत्सुक आहे,' असं ट्विट एलन मस्क यांनी केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपासून एलन मस्क आणि ट्विटरच्या संचालक बोर्डामध्ये चर्चा सुरू होती.

आता एलन मस्क ट्विटरचे नवे मालक बनणार आहेत. एलन मस्क यांनी ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केलं आहे. ट्विटरच्या मंडळाने एलन मस्कचा प्रस्ताव मंजूर केला. ही खरेदी प्रक्रिया चालू वर्षातच पुर्ण केली जाणार आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर खासगी कंपनी होईल आणि एलन मस्कच्या हाती तिची सूत्रे येतील.

ट्विटरची डील झाल्यानंतर एलन मस्क काय म्हणाले?

एलन मस्क यांनी रात्री एक ट्विट केलं. "अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हा सक्रीय लोकशाहीचा आधार आहे आणि ट्विटर डिजिटल जगातील एक टाऊन स्क्वेअर आहे. जिथे मानवतेच्या भविष्याबद्दल महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होते. नवीन सुविधांसह मला ट्विटरला अधिक चांगलं बनवायचं आहे. ट्विटरवरील लोकांचा विश्वास वाढावा म्हणून एल्गोरिदमला ओपन सोर्स बनवायचं आहे. स्पॅम बॉट्स हटवायचं आणि सर्व लोकांना प्रामाणित करणं यामध्ये असेल."

"ट्विटरमध्ये प्रचंड क्षमता आहे. मी ट्विटरला बंधमुक्त करण्यासाठी कंपनी आणि यूजर्सच्या कम्युनिटीसोबत काम करण्यास उत्सुक आहे," असं एलन मस्क यांनी म्हटलं आहे.

या व्यवहाराबद्दल ट्विटरकडून माहिती देण्यात आली. कंपनीने सांगितलं की, कंपनीची किंमत प्रति समभाग (शेअर) ५४.२० डॉलरप्रमाणे लावण्यात आली, जी ४४ बिलियन डॉलर इतकी असेल. या व्यवहाराला परवानगी देण्यासाठी आता समभागधारकांना मतदान करण्यास सांगितलं जाईल, असं ट्विटरने म्हटलेलं आहे.

ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीही एक ट्विट केलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, ट्विटरचा एक उद्देश आणि प्रासंगिकता आहे जी पुर्ण जगाला प्रभावित करते. आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे आणि पुर्वीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण असलेलं काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत," अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.