Elon Musk यांची Twitter सोबतचा करार रद्द केल्याची घोषणा, कंपनी खेचणार कोर्टात

एलॉन मस्क यांनी ट्विटर सोबत केलेला करार रद्द करण्याची घोषणा केली आहे
Elon Musk notifies Twitter he is terminating deal
Elon Musk notifies Twitter he is terminating deal

जगातले सर्वात श्रीमंत उद्योजक असा लौकिक असलेल्या एलॉन मस्क यांनी (Elon Musk) ट्विटरसोबतचा करार रद्द केल्याची घोषणा केली आहे. एलॉन मस्क यांनी २५ एप्रिलला ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची ५४.२० बिलियन डॉलर्सना खरेदी करण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर हा करार ४४ बिलियन डॉलर्समध्ये निश्चित (Contract with Twitter) करण्यात आला. मात्र आता एलॉन मस्क यांनी ही घोषणा केली आहे. ज्यानंतर ट्विटर कंपनीने मस्क यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.

Elon Musk notifies Twitter he is terminating deal
Twitter युजर्सना मोजावे लागणार पैसे, एलॉन मस्क यांनी केली मोठी घोषणा

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या टेक जगतातील हाय व्होल्टेज ड्राम्याला आता नवं वळण लागलं आहे. ट्विटर या कंपनीने करारात ठरलेल्या अनेक गोष्टी पाळलेल्या नाहीत हे कारण देत एलॉन मस्क यांनी या करारातून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे कराराचा भंग केल्या प्रकरणी कंपनीने एलॉन मस्क यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे.

Elon Musk notifies Twitter he is terminating deal
'ट्विटर खरेदी करता आलं नाही, तर...'; अदर पूनावालांनी एलॉन मस्क यांना सूचवला पर्याय

एलॉन मस्क (Elon Musk),

यांच्यासमोर ट्विटर कंपनीने जे प्रेझेंटेशन दिलं ते दिशाभूल करणारं होतं त्यामुळे मस्क यांनी त्यांच्याकडून हा करार रद्द केला आहे असं त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात ट्विटरचे चेअरमन Bret Taylor यांनीही एक ट्विट केलं आहे. ट्विटर बोर्डासोबत एलॉन मस्क यांनी करार केला होता. आता तो पूर्ण करण्यासाठी ते कायदेशीररित्या बांधील आहेत. आम्ही करार पूर्ण व्हावा म्हणून कायदेशीर कारवाई करणार आहोत. कोर्ट आम्हाला न्याय देईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Elon Musk notifies Twitter he is terminating deal
कोण आहे एलन मस्कची नवी गर्लफ्रेंड नताशा बॅसेट?

मागच्या काही आठवड्यापासून एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा हा करार काही कालावधीसाठी थांबवला होता. ट्विटरवर जी काही फेक अकाऊंटस आहेत ती ५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत हे कंपनीने सिद्ध केलं पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं. जो करार माझ्यासोबत करण्यात आला त्यात जे प्रेझेंटेशन दाखवलं गेलं त्यात फेक अकाऊंट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहेत हेच दाखवण्यात आलं होतं ते सिद्ध केलं जावं अशी मागणी एलॉन मस्क यांनी केली होती.

एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातला करार एकाने कुणीही मोडला तर १ बिलियन डॉलर्सची रक्कम पेनल्टी म्हणून द्यावी लागणार आहे. आता एलॉन मस्क यांनी त्यांच्या बाजूने हा करार त्यांच्याकडून मोडला आहे त्यामुळे त्यांना ही रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. मात्र ट्विटरवर केलेला आरोप जर खरा ठरला तर ट्विटरलाही दंड भरावा लागू शकतो. कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतरच या प्रकरणात पुढे काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in