Encounter फेम इसाक बागवान यांची संपत्ती ते मलिकांचा राजीनामा व्हाया बारामती, फडणवीस विधानसभेत सुसाट...

Encounter फेम इसाक बागवान यांच्या संपत्तीच्या मुद्दावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
encounter fame isaque bagwan wealth to nawab malik resignation via baramati fadnavis make serious allegations
encounter fame isaque bagwan wealth to nawab malik resignation via baramati fadnavis make serious allegations(फोटो सौजन्य: विधानसभा)

मुंबई: Encounter फेम माजी पोलीस इसाक बागवान यांच्या संपत्तीबाबतचा एक पेनड्राईव्ह सादर करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर यावेळी बागवान यांनी बारामतीत जमीन खरेदी केली आणि या सगळ्यात एका बड्या राजकीय नेत्याने मध्यस्थी केली अशा स्वरुपाचे आरोपही फडणवीसांनी यावेळी केले आहेत. याच सगळ्याचा संबंध जोडत फडणवीसांनी पुन्हा एकदा नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याची जोरदार मागणी केली.

पाहा नेमकं काय-काय म्हणाले फडणवीस

'एक तक्रार माझ्याकडे आली. या तक्रारीचं पेनड्राईव्ह पण माझ्याकडे आहे. हा पेनड्राईव्ह केवळ गृहमंत्र्यांना देणार आहे. यासाठी नाही की, माननीय अध्यक्षांनी आक्षेप घेतला की, तुम्ही इकडे पेनड्राईव्ह देतात आणि तिकडे मीडियाला देतात. पण तो आमचा अधिकारच आहे. बोलण्याच्या आधीही देण्याचा अधिकार आहे. पण हा एवढ्याकरिता मी आपल्याला देणार आहे कारण की, मी अजून याचं फॉरेन्सिक ऑडिट केलेलं नाही.'

'त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्टीचं जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत मी कोणावरही आरोप लावत नाही. पण आपल्याला कल्पना आहे की, मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त ACP आहेत इसाक बागवान म्हणून. सेलिब्रेटेड आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट होते त्यांना काही पुरस्कार वैगरे पण मिळालेले आहेत. पण आता त्यांच्या बंधूंनी त्यांची तक्रार केलेली आहे. आणि दादा.. त्यांचं बारामती कनेक्शन आहे. हा तुमच्याशी कनेक्शन नाहीए.'

'हे सेवेत असताना मोठ्या प्रमाणात यांनी संपत्ती जमा केली. म्हणजे एकट्या बारामतीमध्ये यांच्या गट क्रमांक 69 मधील 42 एकर NA जमीन आहे त्यांच्याकडे. आपल्याला माहिती आहे बारामतीतील रेट काय आहेत दादा.. दादांचीही नसेल एवढी. नाही त्यांची शेतजमीन असेल ना. बिगर शेतजमीन कशाला असेल ना. ते शेतकरी आहेत. त्यानंतर बागवान यांची खूप जमीन आहे. इथपासून ते मुंबईतील संपत्तीपर्यंत.'

'मुळात इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान वडील इब्राहिम बागवान यांच्या नावावर त्या खरेदी केल्या होत्या. त्यानंतर नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नुसता साधा एक अर्ज दिला. त्या अर्जाच्या आधारावर मालमत्ता त्यांच्या नावावर करुन घेतल्या. एवढंच नाही इसाक बागवान यांनी कपूर नावाच्या व्यक्तीला ही जमीन विकली आणि तीच जमीन दोन महिन्यात पुन्हा परत घेतली. अशा या सर्व जमिनीच्या व्यवहारात आपल्याला हे लक्षात येतं की, यातील काही जमीन कोणाच्या नावाने घेतल्या होत्या तर फरीद मोहम्मद वेल्डर.. याच्या नावे. कोण आहे हा फरीद?'

'2017 मध्ये दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे क्राईम ब्राँचने अटक केली होती त्यावेळी इक्बाल कासकर याने सांगितलं होतं की, हा जो फरीद वेल्डर याला मी पैसे दिले आहेत. फरीदची चौकशी झाल्या-झाल्या 7 दिवसात मृत्यूमुखी पडला. दरम्यान, फरीद वेल्डरने 41 लाखांना तीच प्रॉपर्टी त्यांच्याकडून विकत घेतली होती. मजेची गोष्ट अशी की, विकत घेतलेली ही सर्व संपत्ती त्याने 10 वर्ष नावावर ठेवली आणि आता 30.12.2020 ला फरीद वेल्डरच्या मुलाने ही सगळी संपत्ती इसाक बागवान यांना बक्षीसपत्र म्हणून दिली.'

'या सगळ्यात एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली. यात नसीर बागवानेच केलेलं स्टिंग ऑपरेशन आहे. यात कसा तो राजकीय नेता बारामतीला गेला. बारामतीचा नेता नाही ना हा... संशय तयार करायचा नाहीए हा. मुंबईचा मोठा नेता कसा बारामतीला गेला, कशाप्रकारे त्याने कशी मध्यस्थी केली हे त्या ठिकाणी सांगितलं आहे.'

encounter fame isaque bagwan wealth to nawab malik resignation via baramati fadnavis make serious allegations
'100 लोकांना अटक करण्याचंही ठरलं, पण पुणे पोलिसांवर...', फडणवीसांनी सांगितलेलं 'ते' प्रकरण काय?

'हे सांगण्याचं कारण याकरिता आहे की, आज सातत्याने आम्ही सन्माननीय मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भातील मुद्दा मांडतोय. आता झालं मागच्या वेळेस हायकोर्टात केस होती आता हायकोर्टाने निर्णय दिला. असं असताना एवढी जिद्द का? एखादं दुसरं प्रकरण असतं तर आम्ही त्याचा पाठपुरावा कदाचित कमी केला असता. पण देशाच्या संरक्षणाशी संबंधित आणि मुंबईच्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून अशा प्रकारे मनी लाँड्रिंग करुन या ठिकाणी जमिनी घेतल्यानंतर ईडीने अटक केल्यानंतर ट्रायल कोर्टाने त्यांना कस्टडी दिल्यानंतर हायकोर्टाने ते कन्फर्म केल्यानंतर हा अट्टाहास का आहे की, आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही?'

'सरकारच्या प्रतिमेवर याचा परिणाम होतोय. हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की, केंद्र सरकार, राज्य सरकार.. पण तसं काही नाही. सामान्य माणसाचा प्रश्न आहे. एक मंत्री जेलमध्ये असताना त्याचा राजीनामा का घेतला जात नाही?' असं म्हणत फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in