संप संपवा, टोकाची भूमिका घ्यायला लावू नका! एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांची कळकळची विनंती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सरकारने एक पाऊल पुढे टाकलं आहे, आता टोकाची भूमिका आम्हाला घ्यायला लावू नका असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्याच प्रमाणे संप मिटवावा असंही म्हटलं आहे. जळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे, परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत, त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी आता कामावर रुजू व्हावं असंही त्यांनी म्हटलं आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मागील दोन महिन्यांहून जास्त काळ एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यात संप सुरू आहे. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीवर एसटी कर्मचारी ठाम आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त पगारवाढ दिली आहे. तरीही हा संप मागे घेण्यात आलेला नाही. आता या संपकऱ्यांना अजित पवारांनी नीरवानीरवीचा इशारा दिला आहे.

एक लाख एसटी कर्मचारी आहेत, अंगावर आले तर सरकार काय करेल?-राज ठाकरे

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत अजित पवार?

ADVERTISEMENT

माझी महाराष्ट्रातल्या तमाम एसटी कर्मचाऱ्यांना, कामगारांना आदराची विनंती आहे. तुम्ही ज्या कारणासाठी संप केला आहे त्यासाठी समिती स्थापन केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर समिती जोपर्यंत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत त्याबद्दलचा निर्णय़ राज्य सरकार घेऊ शकत नाही. हे प्रकरण हायकोर्टात आहे, चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

तोपर्यंत आजूबाजूच्या राज्यांपेक्षा आपल्याकड्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार, मानधन हे कमी होतं. आम्ही ते वाढवून दिलं आहे. इतर राज्यांच्या बरोबरीने वेतन, मानधन आणलेलं आहे. एवढा सगळा भार सरकारने घेतलेला आहे. आता शाळा, महाविद्यालयं सुरू झाली आहेत. विविध ठिकाणी भरती होत असते त्यासाठी उमेदवारांना जावं लागतं. अशावेळी एसटी हे महत्त्वाचं साधन आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी हट्टाला पेटले आहेत ते काही योग्य नाही. सगळे आपलेच आहेत. संप आता मागे घ्यावा. प्रश्न मांडणाऱ्यांनीही दोन पावलं मागे सरकलं पाहिजे. आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT