Ajit Pawar: 'प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं', अजित पवारांचा भाजप नेते आशिष शेलारांना सल्ला

Ajit Pawar: 'प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं', अजित पवारांचा भाजप नेते आशिष शेलारांना सल्ला
everyone should speak with dignity ajit pawar advises bjp leader ashish shelar over mumbai mayor kishori pednekar(फोटो सौजन्य: Twitter)

पुणे: भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खास सल्ला दिला आहे. 'आता इथे मुंबई शहराच्या प्रथम नागरिकाबद्दल काय वक्तव्य केलं आहे ते तर आपण सगळ्यांनी बघितलं आहे. टीव्हीवर पण दिसतंय. ते काही छाकून राहिलेलं नाही. प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं.' असं म्हणत अजित पवारांनी आशिष शेलारांचे कान टोचलेत. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाहा अजित पवार नेमकं काय-काय म्हणाले:

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना आशिष शेलार यांनी केलेल्या विधानबाबत जेव्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

'तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की, आता इथे सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले तर आमचा काही संबंध नाही. त्या संस्थांना तो अधिकार आहे त्यांनी दाखल केले. आता इथे मुंबई शहराच्या प्रथम नागरिकाबद्दल काय वक्तव्य केलं आहे ते तर आपण सगळ्यांनी बघितलं आहे. टीव्हीवर पण दिसतंय. ते काही छाकून राहिलेलं नाही.'

'शेवटी आपल्याकडे परंपरा आहे आपण महिलेचा आदर करतो. आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो. चव्हाण साहेबांची आपल्याला तशी शिकवण आहे. शिवाजी महाराजांची उदाहरणं देतो. त्यांच्या काळामध्ये काय-काय.. कसं-कसं महिलांना संरक्षण देण्याचं काम केलं गेलं.'

'असं असताना मुंबईच्या महापौरांनी रितसर तक्रार दाखल केली. तर तिथे मात्र लगेच राजकारण अशी ओरड झाली. पण असं नाहीए. प्रत्येकाने तारतम्य ठेवून बोलावं.'

'आपणही पाहा मधल्या एसटीच्या संपाबाबत देखील काही-काही लोकं काय-काय वक्तव्य करत होते. काय शब्द वापरत होते. काय त्यांनाच ते शब्द वापरता येतात का? दुसऱ्यांना पण ते शब्द वापरता येतात. पण दुसरे तारतम्य ठेवून त्या ठिकाणी बोलतात, वागतात.'

'एखादा आरे म्हटलं तर दुसऱ्याला कारे म्हणता येतं. मी म्हणतो राष्ट्रवादीच नाही. जेवढे राजकीय पक्ष आहेत, सामाजिक संघटना यांनी प्रत्येकांनी लोकांच्या समोर जात असताना बोलत असताना, वावरत असताना थोडंसं आपल्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे.'

'ज्याच्यातून कोणता समाज नाराज होईल, कुठला घटक नाराज होईल. अशा प्रकारचं वक्तव्य कोणीच करु नये. आमच्यासहीत कोणीच करु नये.' असा सल्लाच अजित पवार यांनी दिला आहे.

आशिष शेलारांनी महापौर यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं?

आशिष शेलार यांनी भाजप कार्यालयात घेतलेली पत्रकार परिषद वरळीतील सिलिंडर स्फोटाबाबत होती ज्यात तीन जणांचा बळी गेला आहे. वरळीतील बीडीडी चाळीत 30 नोव्हेंबर रोजी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. याच पत्रकार परिषदेत शेलार यांनी महापौरांच्या उदासीन वृत्तीकडे लक्ष वेधले आणि त्या झोपल्या आहेत का? असा सवाल केला होता.

everyone should speak with dignity ajit pawar advises bjp leader ashish shelar over mumbai mayor kishori pednekar
'ठाकरे सरकारच्या मुस्कटदाबीला घाबरणार नाही!' FIR रद्द करण्यासाठी आशिष शेलार यांची हायकोर्टात धाव

महापौर किशोरी पेडणेकर यांची शेलार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

दरम्यान, आशिष शेलार यांच्या या वक्तव्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांच्याविरोधात दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कलम 354 अ (4) (लैंगिक टिप्पणी करणे) आणि 509 (महिलांच्या विनयशीलतेचा अपमान करणारे शब्द किंवा हावभाव) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांच्याविरुद्ध आयपीसीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेलार यांनी 4 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधातच आशिष शेलार यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in