Exclusive: अनिल देशमुखांचं कोर्टाला पत्र, पाहा नेमकं काय म्हटलं या पत्रात

Anil Deshmukh Letter: अनिल देशमुख यांनी कोर्टाला एक पत्र लिहलं आहे. पाहा या पत्रात नेमकं काय म्हणालेत.
Exclusive: अनिल देशमुखांचं कोर्टाला पत्र, पाहा नेमकं काय म्हटलं या पत्रात
exclusive former maharashtra home minister anil deshmukh letter to the court enforcement directorate custody 15 november(फाइल फोटो)

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत पुन्हा एकदा तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना 15 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कस्टडीतच काढावे लागणार आहेत. अशावेळी अनिल देशमुखांनी स्वत: लिहलेलं एक पत्रच कोर्टाला दिलं आहे. या पत्रात अनिल देशमुख यांनी थेट नमूद केलं आहे की, 'मी जो जबाब दिला आहे त्यातील काही गोष्टी माझ्याविरोधात वापरण्यात येऊ नयेत.' त्यामुळे आता अनिल देशमुखांचं हे पत्र म्हणजे त्यांनी आपला जबाब एक प्रकारे नाकारला आहे असंच म्हटलं जातं.

अनिल देशमुखांनी कोर्टाला लिहलेल्या पत्रकात नेमकं काय म्हटलंय?

अनिल देशमुखांच्या ईडी कस्टडीत सध्या वाढ करण्यात आली आहे. याआधी अनिल देशमुखांनी स्वत: लिहलेलं एक पत्र कोर्टाला दिलं आहे. साधारणपणे ईडीकडे दिलेलं जबाब हा कोर्टात पुरावा म्हणून वापरता येत नाही. त्यामुळेच अनिल देशमुखांनी हे पत्र दिलं आहे.

कोर्टाला जे पत्र दिलं आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की, 'त्यांना इन्सोमिनिया, हायपर टेन्शन या सारख्या व्याधींचा त्रास आहे. तसेच प्रकृतीविषयी इतर देखील त्रास आहेत. तसंच माझे वय 72 वर्ष आहे. ही गोष्टही ध्यानात घेण्यात यावी.' असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

पुढे त्यांनी असंही म्हटलं आहे की, 'ईडीकडून 9-9 तास माझी चौकशी सुरु होती. यामुळे आलेला थकवा आणि झालेली दमछाक यातून काही उत्तरं दिली गेली असतील तर ती ग्राह्य धरु नये.' अशा आशयाचं पत्र त्यांनी कोर्टात दिलं आहे.

म्हणजेच या पत्राद्वारे अनिल देशमुख हे कोर्टाला हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की, ईडीची जी काही चौकशी सुरु आहे त्याला ते सहकार्य करत आहेत. पण माझ्या तोंडात चुकून काही शब्द आले असतील तर ते माझ्याविरोधात वापरण्यात येऊ नयेत. असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ईडीकडून महाराष्ट्रातील बदली आणि पोस्टिंग प्रकरणाची चौकशी सुरु

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ईडीला बदली आणि पोस्टिंग संदर्भात काही महत्त्वाची माहिती मिळत आहे आणि त्याचाची चौकशी करण्यासाठी ईडीने अनिल देशमुखांची कस्टडी वाढवून मागितली होती. जी मंजूरही करण्यात आली आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या सगळ्या प्रकरणात सचिन वाझे याची कस्टडी आता ईडी मागत आहे. आतापर्यंत ईडीचा रोख हा वसुलीच्या आरोपांकडे होता. मात्र, आता त्यांचा रोख बदली आणि पोस्टिंग प्रकरणाकडे वळला आहे.

ज्या बदली आणि पोस्टिंगबद्दल ईडी तपास करु इच्छितं त्याविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की, पोलीस खात्यातील ज्या बदल्या आणि पोस्टिंग होतात त्या पोलीस एस्टॅबलिशमेंट बोर्ड यांच्या अंतर्गत होतात. त्यावर सही डायरेक्ट जनरल पोलीस ऑफ महाराष्ट्र यांची असते. त्यामुळे जेव्हा या बदल्या झाल्या असा आरोप केला जात आहेत. त्यावेळी डीजी कोण होते तर सुबोध जयस्वाल.

जे आता सीबीआयचे संचालक आहेत. पण यावेळी हे स्पष्ट करण्यात आलं नाही की, सुबोध जयस्वाल यांचं स्टेटमेंट घेतलं जाईल की नाही. पण अनिल देशमुखांच्या कार्यकाळातील बदली आणि पोस्टिंग यांची चौकशी ईडीने आता सुरु केली आहे.

exclusive former maharashtra home minister anil deshmukh letter to the court enforcement directorate custody 15 november
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ, बॉम्बे हायकोर्टाकडून दिलासा नाही

काय आहे नेमकं प्रकरण?

25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेचे नाव समोर आले होते. यानंतर याप्रकरणी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्र सरकारने आयुक्त पदावरुन हटवलं होतं.

यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खळबजनक पत्र लिहिलं होतं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझे याच्याकडे दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा दावा परमबीर सिंग यांनी या पत्रात केला होता. याच प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in