Facebook Down: झुकरबर्गला 'एवढ्या' हजार कोटींचे नुकसान, Facbook-Whatsapp ला झालेलं तरी काय?

Facebook Whatsapp and Instagram server down: फेसबुकसह, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम हे सगळं एकाच वेळी बंद पडल्याने मार्क झुकरबर्ग याला प्रचंड नुकसान झालं आहे.
Facebook Down: झुकरबर्गला 'एवढ्या' हजार कोटींचे नुकसान, Facbook-Whatsapp ला झालेलं तरी काय?
facebook whatsapp instagram server down ceo zuckerberg loses 7 billion dollar(फाइल फोटो)

कॅलिफोर्निया: फेसबुक डाऊन झाल्यामुळे (Facebook face mega outage) सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याचं वैयक्तिकरित्या प्रचंड नुकसान झालं आहे. फेसबुकवर डाऊन झाल्याने अवघ्या काही तासात झुकरबर्गची संपत्ती 7 अब्ज डॉलर (सुमारे 52 हजार कोटी रुपये) कमी झाली आणि अब्जाधीशांच्या यादीत ते एका क्रमांकाने खाली आला आहे.

भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 10 च्या सुमारास जगभरातील फेसबुकच्या सर्व सेवा बंद पडल्या होत्या. फेसबुकच्या सेवेव्यतिरिक्त इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, अमेरिकन टेलिकॉम कंपन्या सेवा जसे की, Verizon, At&t आणि T Mobile यांच्या सेवाही अनेक तास ठप्प झाल्या होत्या.

काही तासात फेसबुकच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण

हे सर्व पाहता, अमेरिकन शेअर बाजारात फेसबुकच्या शेअर्सची विक्री सुरू झाली आणि एका दिवसात त्याची किंमत 5 टक्क्यांनी कमी झाली. सप्टेंबरच्या मध्यापासून फेसबुकच्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची घट झाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्गची 5व्या क्रमांकावर घसरण

Bloomberg बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, Zuckerberg च्या संपत्तीत घट होऊन ती आता 120.9 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे तो बिल गेट्सच्या क्रमांकाच्या देखील खाली म्हणजे 5व्या स्थानावर गेला आहे. यापूर्वी तो या यादीत चौथ्या स्थानावर होता. या वर्षी 13 सप्टेंबरपासून त्याच्या संपत्तीत 19 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सोमवारी रात्री अनेक तास सेवा विस्कळीत झाल्या होत्या. त्यानंतर पहाटेच्या सुमारास काही सुधारणा झाल्या. पहाटे 4 च्या सुमारास फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या सेवा पुन्हा सुरू झाल्या. पण यामुळे अब्जावधी यूजर्संना बराच काळ अडचणीचा सामना करावा लागला.

सेवा हळूहळू पूर्ववत झाल्या

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर आता पूर्ववत झाल्या आहेत. कित्येक तास या सेवा डाऊन झाल्यानंतर आता त्या हळूहळू सुरु झाल्या आहेत. याशिवाय फेसबुकच्या इतर अनेक सेवाही ठप्प होत्या. न्यूज एजन्सी रॉयटर्सने माहिती दिली की, सुमारे सहा तास या सेवा डाऊन झाल्या होत्या. ज्या आता सुरु झाल्या आहेत.

facebook whatsapp instagram server down ceo zuckerberg loses 7 billion dollar
हुश्श... 'सोशल' जीवन पूर्वपदावर! 6 तासांनंतर व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकची सेवा पूर्ववत

फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजर या सारख्या चारही महत्त्वाचे सोशल मीडिया एकाच वेळी डाऊन झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. पण यामागचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. काही लोकांनी याला सायबर हल्ला म्हटले आहे तर काहींनी सांगितले की हा DNS मुद्दा आहे. त्याच वेळी, कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले होते की, त्यांना याची माहिती आहे आणि ते त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

झुकरबर्ग काय म्हणाला?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने म्हटले आहे की, 'फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि मेसेंजर हे पूर्ववत झाले आहेत. व्यत्ययाबद्दल क्षमस्व. मला कल्पना आहे की, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात'

Related Stories

No stories found.