Farm Laws : मोदींनी आज 'त्या' भाजपा नेत्यांच्या अन् भक्तांच्या कानशिलात लगावली -संजय राऊत

तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची केंद्राची घोषणा : संजय राऊतांनी फोटो ट्वीट करत केलं स्वागत
Farm Laws : मोदींनी आज 'त्या' भाजपा नेत्यांच्या अन् भक्तांच्या कानशिलात लगावली -संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत आणि शेतकरी नेते राकेश टिकैत.Sanjay Raut/twitter

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांवरून गेल्या वर्षभरापासून घमासान सुरू आहे. तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशातील काही शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केलं होतं. या शेतकरी आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने आज तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींनी याची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपा नेत्यांवर निशाणा साधला.

केंद्र सरकारने 'शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक-2020', 'शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक-2020', 'अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक-2020' हे तीन कृषी कायदे लागू केले होते. या कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. भारत बंद, ट्रॅक्टर मार्चपासून विविध मार्गाने शेतकऱ्यांनी केंद्राचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अखेर केंद्राने आज कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली.

शिवसेना नेते संजय राऊत आणि शेतकरी नेते राकेश टिकैत.
PM Modi : शेतकरी आंदोलनाचा विजय! कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

या निर्णयाचं सर्वांकडून स्वागत करण्यात येत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. मोदींनी घोषणा केल्यानंतर राऊतांनी एक फोटो ट्वीट केला आहे. 'जय जवान, जय किसान', असं राऊतांनी म्हटलेलं आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्ये राऊतांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. 'जे आपल्याच देशातील शेतकऱ्यांना दहशतवादी, खलिस्तानवादी, बोगस शेतकरी म्हणत होते, आज मोदीजींनी त्यांच्या कानशिलात लगावली आहे. मग ते भाजपाचे नेते असो वा अंधभक्त', असं अशी टीका राऊतांनी केली.

शिवसेना नेते संजय राऊत आणि शेतकरी नेते राकेश टिकैत.
आधी भूसंपादन, आता कृषी कायदा... पाहा मोदी सरकार आतापर्यंत किती वेळा शेतकऱ्यांसमोर झुकलं

कायदे रद्द करण्याची घोषणा करताना मोदी काय म्हणाले?

"कृषी कायद्यासंदर्भातील सर्व घडामोडी देशवासियांना माहिती आहेत. मी आज देशवासीयांची माफी मागतो. खऱ्या मनाने आणि पवित्र ह्रदयाने सांगू इच्छितो की आमच्या तपश्चर्येत उणीव राहिली. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाप्रमाने असलेलं सत्य आम्ही काही शेतकरी बांधवांना समजून सांगू शकलो नाही. आज गुरूनानकजींचा पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणाला दोष देण्याचा नाही. मी देशाला हे सांगण्यासाठी आलोय की, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल", अशी घोषणा मोदी यांनी केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in